

मुंबईकरांना महागाईचा झटका
मुंबईमध्ये १ सप्टेंबरपासून दुधाचे दर वाढणार
एक लिटर दूध ९ रुपयांनी महागणार
मुंबईत एक लिटर दूध १०२ रुपयांना मिळणार
मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. सणासुदीच्या काळात मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे. मुंबईमध्ये दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध उत्पादकांनी एक लिटर दुधाचे दर ९ रुपयांनी वाढवले आहे. अचानक दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये दूधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून नवे दर लागू होणार आहे. मुंबईतील घाऊक आणि किरकोळ दूध उत्पादकांनी दुधाच्या दरात प्रति लिटर ९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता ९३ रुपयांना मिळणारे एक लिटर दूधासाठी १०२ रुपये मोजावे लागणार आहेत. दूध उत्पादकांनी हे देखील सांगितले की, हे नवीन दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू असणार आहेत.
दूध उत्पादकांनी दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यामागचं देखील कारण समोर आले आहे. बाजारामध्ये पेंड आणि इतर पशुखाद्याचा खर्च देखील वाढला आहे. महागाई वाढल्यामुळे त्याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर देखील झाला आहे. उत्पादकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, उत्पादन खर्च इतका वाढला होता की, टिकून राहण्यासाठी त्यांना किमती वाढवणे भाग पडले. या आर्थिक दबावामुळे त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागले. ज्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडेल. उत्पादकांच्या या निर्णयाचा मोठा आणि थेट परिणाम मुंबईतील सामान्य लोकांच्या खिशावर होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.