Mhada Home Price : खूशखबर! म्हाडाची घरं स्वस्त होणार; किंमती २५ टक्क्यांनी कमी, राज्य सरकारची घोषणा

Mhada lottery 2024 : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हडाच्या घराच्या किंमतीमध्ये कपात करणार असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील म्हाडा घराची लॉटरी जाहीर करण्यात आली होती.
MHADA
MHADA Saam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई

MHADA Lottery : म्हाडाच्या घराच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हडाच्या घराच्या किंमतीमध्ये कपात करणार असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील म्हाडा घराची लॉटरी (mhada house in mumbai) जाहीर करण्यात आली होती. घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे म्हाडाच्या घराकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री अतुल सावे (atul save) यांनी मुंबईत याबाबतची घोषणा केली.

म्हाडाच्या घरांच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी कमी होतील, असे अतुल सावे यांनी सांगितले. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार आहे.

MHADA
Mhada Lottery: म्हाडा लॉटरीकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ! आठ दिवसात फक्त ५४०३ अर्ज; अल्पप्रतिसादाचे नेमकं कारण काय?
MHADA
Mhada Lottery 2024 : मुंबईतील २०३० घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल होणार, प्रकल्पातून होणारी कमाई किती? वाचा

कोणत्या घराच्या किंमती किती कमी होणार ?

33(5) आणि 33(7) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनातील घरे विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत.

उच्च उत्पन्न गटासाठी 10 टक्के कमी

मध्यम गटासाठी 15 टक्के

अल्प गटासाठी 20 टक्के

आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किमती 25 टक्क्यांनी कमी होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com