Mumbai Dabbawala: डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत मिळणार हक्काचं घर २५ लाखांत

Mumbaicha Dabbawala Home: मुंबईच्या डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. डबेवाल्यांना मुंबईमध्ये हक्काचे घर अतिशय स्वस्त:त मिळणार आहे. जाणून घ्या एका क्लिकवर...
Mumbaicha Dabewala: डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत मिळणार हक्काचं घर २५ लाखांत
Mumbaicha DabewalaSaam Tv
Published On

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या डबेवाल्यांना मुंबईमध्ये हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबचे आश्वासन दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेत म्हाडातर्फे या घरांची निर्मिती केली जाणार आहे. चर्मकार समाजाला सुद्धा घरे मिळणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात डबेवाल्यांच्या घराबाबत घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेने आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी बैठकीला उपस्थित होते.

Mumbaicha Dabewala: डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत मिळणार हक्काचं घर २५ लाखांत
Mumbai Coastal Road: मरीन ड्राइव्ह ते वांद्रे ट्रॅफिक फ्री प्रवास; नवीन कोस्टल रोडबद्दल जाणून घ्या A टू Z माहिती

गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत म्हाडातर्फे डबेवाल्यांसाठी घरांची निर्मिती केली जाणार आहे. चर्मकार समाजाला सुद्धा घरे मिळणार आहे. १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. यात चर्मकार समाजातील बांधवांसाठी सुद्धा घरे बांधण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी ३० एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार आहे. नमन बिल्डर या घरांचे बांधकाम करणार आहे. ना नफा ना तोटा तत्वावर या घरांचे काम केले जाणार आहे. १२ हजार घरांची निर्मिती होणार आहे. ५०० चौरस फूट आकाराचे घर फक्त २५ लाखांत दिले जाणार आहे. डबेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न 3 वर्षांत पूर्ण होणार आहे.

Mumbaicha Dabewala: डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत मिळणार हक्काचं घर २५ लाखांत
Mumbai News : हा काय रोड हाय? सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला भगदाड, कार २० फूट गेली खाली, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com