Mumbai News : हा काय रोड हाय? सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला भगदाड, कार २० फूट गेली खाली, पाहा VIDEO

Road caved in Prabhadevi Junction area : प्रभादेवी जंक्शन परिसरामध्ये रस्ता खचला. याठिकाणी एक कार अडकलेली होती.
 प्रभादेवी जंक्शन परिसरामध्ये रस्ता खचला
Mumbai News Saam Tv
Published On

सुरज मसुरकर, साम टीव्ही मुंबई

प्रभादेवी जंक्शन परिसरात रस्ता खचला खचल्याची घटना आज समोर आलीय. खचलेल्या रस्त्याची १५ ते २० फूट खोली असल्याचं सांगितलं जातंय. खचलेल्या रस्त्यात एक चारचाकी अडकली होती. ही चारचाकी अर्ध्या तासानंतर स्थानिकांनी बाहेर काढली. रस्ता खचला असल्यामुळे कार थेट खड्ड्यात गेली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला असल्याचं समोर आलंय. सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला भगदाड पडलंय.

व्हीआयपी रस्ता खचला

मुंबईतील प्रभादेवी परिसरात सिग्नलवरच असलेला व्हीआयपी रस्ता खचला (Mumbai News) आहे. आज सकाळी या रस्त्यावर गाडी अडकली होती. आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता खचण्याचं कारण शोधताना दिसून येत आहेत. भरधाव वेगातील कार अचानकपणे रस्त्यात खाली गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्यात गाडी अडकलेली आहे. रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला दिसत आहे.

मनसे नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

रस्ता खचल्याचीही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील अशा घटना घडलेल्या (road caved in Prabhadevi Junction) आहेत. पाण्याच्या लाईन देखील लिकेज आहेत,काम का करत नाही? असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलाय. काम करायची सरकारची इच्छा शक्ती नाही, असं धुरी यांनी म्हटलंय. इथे अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. पावसाळा असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

 प्रभादेवी जंक्शन परिसरामध्ये रस्ता खचला
Versova-Dahisar Coastal Road: नदी-खाडीच्या खालून जाणार भूयारी मार्ग, खर्च किती अन् वेळ किती वाचणार?

रस्त्यावरून जीवघेणा प्रवास

या रस्त्याचं काम होणं खूप गरजेचं आहे. उत्सवाचे दिवस (Car Accident) आहेत, आज गौरी गणपतीं विसर्जन आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक प्रभादेवी बीचला येतात. नशीबाने याठिकाणी मोठी दुर्घटना घडली नाही. सरकारला विनंती आहे, हा रस्ता काम होईपर्यंत बंद ठेवावा. सीलिंक मार्गे मोफत गाड्या सोडून तात्काळ हे काम करायला हवं, अशी मागणी त्यांनी केलीय. शहरातील नागरिकांना या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करा, अशी मागणी (Accident News) केलीय.

 प्रभादेवी जंक्शन परिसरामध्ये रस्ता खचला
53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com