Mega Block on Western Railway : पश्चिम रेल्वेवर ११ दिवस मेगाब्लॉक, २५० लोकल रद्द; कसं असेल वेळापत्रक?

Mega Block News : २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega Blocksaam tv
Published On: 

Mumbai News :

रेल्वे प्रशासनाकडून हार्बरनंतर आता पश्चिम रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या जोडणीच्या कामसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सलग ११ दिवस हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या तब्बल २५० लोक रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेने प्रवास करुन मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या सर्व प्रवाशांना मेगाब्लॉकदरम्यान मोठा मनस्तान सहन करावा लागू शकतो.

मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. दसऱ्यानंतर या कामाला वेगाने करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. त्यासाठी २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block
Namo Shetkari Yojana: जय किसान! नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी, प्रत्येकाला ₹ १२००० मिळणार

मेगाब्लॉकदरम्यान या मार्गावर २५० लोकल रद्द करण्यात येणार आहेत, तर ६१ मेल रद्द करण्यात येणार आहेत. नव्या मार्गिकेवरील रुळजोडणीसाठी रेल्वेची वाहतूक थांबवणे गरजेचं आहे. त्यामुळे रेल्वे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

सहाव्या मार्गिकेचा फायदा काय?

सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान प्रत्येकी दोन जलद आणि धीम्या मार्गिका आहेत. तर पाचव्या मार्गिकेवरुन मेल एक्सप्रेस धावतात. मात्र सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर मेल आणि एक्सप्रेस वाहतुकीसाठी याचा फायदा होईल. येत्या नोव्हेंबरपर्यंत या सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांना आहे.

Mumbai Local Mega Block
Cabinet Decision : मुली होतील लखपती; शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

मुंबईकरांना काय फायदा होणार?

सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकलच्या जवळपास २० टक्के फेऱ्या वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवासांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com