मुंबईत अग्नितांडव, २४ तासांत ३ ठिकाणी आगीच्या दुर्घटना, एक्स्प्रेसचा डबाही पेटला

Emergency Safety Measures In Mumbai Fires: मुंबईत २४ तासांत तीन ठिकाणी आग लागल्या; गोरेगाव उच्च इमारत, नेव्हल डॉकयार्ड आणि लोअर परळ वर्कशॉपमध्ये मेल एक्स्प्रेसचा डबल डेकर कोचही जळाला.
Firefighters tackle blaze at Mumbai high-rise as emergency teams respond swiftly.
Firefighters tackle blaze at Mumbai high-rise as emergency teams respond swiftly.Saam Tv
Published On

मुंबई: येथे आज सकाळपासून तीन ते चार ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वात पहिली घटना ही गोरेगाव पूर्व येथील गोखुलधाम परिसरातील कृष्णा वाटिका रोडवरील डीबी वुड या ग्राउंड प्लस 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. सकाळी 9.11 वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर 9.25 वाजता आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन आणि घरगुती साहित्यापर्यंतच मर्यादित होती.

इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया व टेरेसवर हलविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी चार फायर इंजिन, चार जंबो टँकर, अ‍ॅडव्हान्स वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हाय प्रेशर पंप व इतर बचाव साहित्य तैनात करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनी व बीएमसी कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दक्षिण मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये भीषण आग;

दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या नेव्हल डॉकयार्ड परिसरात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार रात्री सुमारे 10.15 वाजता कुलाबा येथील नेव्हल डॉकयार्डमधील एका इमारतीत आग भडकली. घटनास्थळी भारतीय नौदल तात्काळ दाखल झाले असून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसून वेस्टर्न नेव्हल कमांडकडून लवकरच अधिकृत निवेदन अपेक्षित आहे.

लोअर परळ वर्कशॉपमध्ये मेल एक्स्प्रेस डबल डेकर कोचला आग

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये आज सकाळी मेल एक्स्प्रेसच्या डबल डेकर कोचला आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहिती नुसार, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून तातडीच्या पथकांनी आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानिक सुरक्षा उपायांना तातडीने सक्रिय केल्याचे सांगितले असून, पुढील तपास सुरू आहे. आगीमुळे काही वेळेस वर्कशॉपमधील कामकाजावर तात्पुरते परिणाम झाला, मात्र घटना तातडीने नियंत्रणात आल्याने मोठे नुकसान टळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com