Pune Fire News: पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, ३ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

Pune Latest News: पुण्यातील प्रसिद्ध भोरी आळीमध्ये असलेल्या ३ मजली इमारतीला सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
 पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, ३ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी
Pune Fire NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

Pune News Today

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध भोरी आळीमध्ये असलेल्या ३ मजली इमारतीला सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. इमारतीतील नागरिक तत्काळ घराबाहेर पडले.

 पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, ३ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी
Mumbai BJP Office Fire : मोठी बातमी! मुंबईतील भाजप कार्यालयाला आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) ६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे.

पुण्यातील (Pune News) रविवार पेठ येथे असलेल्या रामसुख चेंबर्स, भोरी आळी येथे तीन मजली व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकाने असून सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास यातील काही दुकानांना अचानक आग लागली.

बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले. दरम्यान, आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथामिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाची धावपळ होत आहे.

 पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, ३ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी
Pune Corporation : उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १६ हजार नागरिकांवर कारवाई; पुणे महापालिकेकडून दंड वसूल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com