Pune Fire News: पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, प्रसिद्ध गॅरेजलला भीषण आग; १७ वाहने जळून खाक

Pune Garage fire: पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला शुक्रवारी (ता. १५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत १७ वाहने जळून खाक झाली.
Pune Fire News
Pune Fire NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

Pune Ganga Dham area Garage fire

पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला शुक्रवारी (ता. १५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा घातला. आग लागल्याचं कळताच परिसरात आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Fire News
Pune Breaking News: पुणे ISIS दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट; NIA तपासात धक्कादायक माहिती उघड

आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत तब्बल १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली आहे.

याशिवाय गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत एक प्रसिद्ध गॅरेज आहे. (Latest Marathi News)

या गॅरेजमध्ये शहरातील अनेक वाहनाचालक तसेच मालक आपली वाहने दुरुस्तीसाठी आणतात. अशातच शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गॅरेजला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, १७ वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय गॅरेजमधील मौल्यवान साहित्य देखील जळाले आहे.

Pune Fire News
Rain Alert: सावधान! पुढील ७२ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; राज्यातील 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com