Pune Crime : IT मुलाला मुलगी दिली, दोघांना गोंडस मुलगी झाली म्हणून विवाहितेला १५ दिवस उपाशीपोटी डांबलं; पुणे हादरलं

Pune Crime News : हतबल आणि निराश होऊन शिवानी चंदनशिवे यांनी तिने अखेर माहेरचा आसरा घेतला आहे. शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळे सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv News
Published On

योगेश काशिद, साम टिव्ही

बीड : मुलगी नको! ही मानसिकता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा पाहायला मिळाला आहे. मुलगी जन्माला आली म्हणून बीडमधील विवाहित महिलेला चक्क १५ दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला. ही घटना सुसंकृत मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात घडली आहे. संधी मिळताच चिमुकल्या बाळाला घेऊन विवाहितेनं बीड गाठलं, आणि बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हतबल आणि निराश होऊन शिवानी चंदनशिवे यांनी तिने अखेर माहेरचा आसरा घेतला आहे. शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळे सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगलं गेलं. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. आणि येथूनच खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याला ग्रहण लागले. मुलगी जन्मला का घातली म्हणून पतीसह सासू - सासरा आणि दिराने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले. मृत्यूची दरी समोर दिसत असताना एका दिवशी घरी कोणीही नसल्याचे पाहून कडी कोयंडा तोडून शिवानीने पुण्यातून पळ काढला आणि थेट बीड गाठले. आई वडिलांच्या सोबतीने तिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून सासरच्या क्रूर विकृतीचा पाढा वाचला.

Pune Crime News
Ladki Bahin Yojana : तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही? ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...

माझ्या मुलीवर झालेला क्रूर छळ पाहून शिवानीचे कुटुंब देखील पुरतेच हादरून गेलं आहे. मुलगी झाली म्हणून मुलीचे हालहाल करत जाच केला. या क्रूर असलेल्या माणसांमधील राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवानीच्या आईने केली आहे.

या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सर्वच आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. शिवानीची आप बीती ऐकल्यानंतर बीड पोलिस देखील चक्रावून गेले होते. शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी देखील मदतीचा हात देत शेवटपर्यंत या प्रकरणात आम्ही साथ देण्याचा दावा पोलिसांनी केलाय.

Pune Crime News
बेगानी शादी में अब्दुला...; ठाकरे-पवार युतीच्या चर्चांवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला मान खाली घालवणारे ठरले. अशात आता मुलगी झाली म्हणून विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला. या घटनेने सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्याला आणखीन एक कलंक लागला आहे. मुलगी नकोय म्हणून समाजातील बुरसटलेल्या विकृत चंदनशिवे कुटुंबाला पोलिस बेड्या कधी ठोकतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Pune Crime News
Maharashtra Politics : आषाढी एकादशीला राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com