Dombivli News : जळगावहून रक्षाबंधानासाठी डोंबिवलीत आलेल्या विवाहितेची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं जीवन

Women Jumps From 4th Floor : डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरात ही घटना घडली.
Women Jumps From 4th Floor
Women Jumps From 4th FloorSaam TV
Published On: 

अभिजीत देशमुख

Dombivli News :

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरात ही घटना घडली.

पूजा सोळंके असं महिलेचे नाव आहे. महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवलं आहे. मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या पूजा रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगरहून आपल्या पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नंदेकडे आली होती. (Latest Marathi News)

नंदेच्या घरी राहत असताना पतीसोबत काही कारणावरुन वाद झाला. या वादानंतर महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Women Jumps From 4th Floor
Mumbai News : मद्यधुंद महिलेचा पबमध्ये धिंगाणा; पब कर्मचारी-पोलिसांवर हल्ला करत चावाही घेतला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मुक्ताईनगर येथे पूजा सोळंके ही आपल्या पतीसह राहते. आठ महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले होते. पूजा रक्षाबंधनानिमित्त नंदेकडे आली होती. दरम्यान तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्याला पूजाने इमारतीच्या चौथा मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या माहिती मिळतेच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Crime News)

Women Jumps From 4th Floor
Maval News: ऑनलाईन गेमचा जीवघेणा टास्क? 'आत्महत्या करतोय...' मित्राला मेसेज करत १०वीतील मुलाने संपवले आयुष्य

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची आत्महत्या

मुंबई घाटकोपर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com