Mumbai Crime : मराठी माणसावर पुन्हा हल्ला; ३ परप्रांतीय महिलांकडून शिवीगाळ आणि मारहाण, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Mumbai crime news : मुंबईच्या जुहूमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही बहिणींनी मराठी माणसाला मारहाण केली. या मारहाणीनंतर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत मराठी माणसांची गळचेपी सुरुच आहे. मुंबईत पुन्हा एकदा एका मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांताक्रूझमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना ताजी असताना आता जुहूमध्येही असाच प्रकार घडला आहे. मुंबईच्या जुहूमध्ये मराठी माणसावर तीन परप्रांतीय महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जुहूनमध्ये मराठी माणसावर परप्रांतीय महिलांनी भरदिवसा हल्ला केल्याची घटना घडली आहे. जुहू लोटस आय हॉस्पिटलसमोर असलेल्या गॉड गिफ्ट वसाहतीत घटना घडली आहे. वसाहतीमध्ये असलेल्या परप्रांतीय पांडे नावाच्या तीन मुलींकडून मराठी माणसाला शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. शिवीगाळ आणि मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mumbai Crime News
Marathi language Row : RSSच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने नाव वाद; भय्याजींनी नाकारली मुंबईत मराठी?

डिंपल पांडे आणि तिच्या दोन बहिणींकडून शेजाऱ्यांना नेहमीच त्रास देत असल्याचं माहितीत उघड झालं आहे. त्या बहिणींविरोधात जुहू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Mumbai Crime News
Manu Bhaker Medals: मनू भाकरला Paris Olympics मध्ये जिंकलेले मेडल्स परत करावे लागणार; जाणून घ्या कारण

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

मराठी व्यक्ती दुचाकीने येते. त्यानंतर एक तरुणी समोरून येते. त्यानंतर या तरुणीने मराठी माणसाला हातातील एका वस्तूने मारहाण केली. त्यानंतर तिन्ही बहिणींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तिन्ही बहिणींनी मारहाण केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये धक्काबुकी झाली. काही जण हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com