MPSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता कधी होणार? जाणून घ्या

MPSC Exam Update News : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणारी परीक्षा स्थगित असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
MPSC Exam News
MPSC Exam NewsAI image
Published On: 
Summary
  • MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 स्थगित

  • 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीतील परीक्षा आता या तारखांना होणार नाही.

  • सुधारित परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेबरोबरच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ यांनाही स्थगिती देण्यात आली आहे. या तिन्ही परीक्षांच्या नव्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

पेपर फुटीनंतर आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आगामी मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, सध्या तयार असलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहेत का, याबाबत एमपीएससीने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे परीक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही उमेदवारांमध्ये या मुद्द्यावर संभ्रम कायम आहे.

MPSC Exam News
Rat Control : घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? 'या' ६ घरगुती ट्रिक्स वापरून कायमचा काढा तोडगा

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ अवघ्या काही दिवसांवर आली असताना प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नव्याने सेट करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. . गरज भासल्यास परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, राज्यसेवा २०२५च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावरही काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांची दखल घेत आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

MPSC Exam News
Ration Card : रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई, महिनाभरात १३ ,२४१ लाभार्थ्यांचा लाभ बंद; कारण आलं समोर

राज्यभरातील परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर आयोगाने या मागणीची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com