Sachin Waze: गृहमंत्री देशमुख पवारसाहेब जयंत पाटील यांच्या नावाने दबाव; वाझेने फडणवीसांना लिहिलेलं पत्र सामच्या हाती
Sachin Waze Letter To Devendra Fadnavis

Sachin Waze: गृहमंत्री देशमुख पवारसाहेब जयंत पाटील यांच्या नावाने दबाव; वाझेने फडणवीसांना लिहिलेलं पत्र सामच्या हाती

Sachin Waze Letter To Devendra Fadnavis : हत्येप्रकरणात तुरुंगात असलेले सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मोठं-मोठ्या नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर आरोप केले आहेत.
Published on

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगात असलेले निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझेने देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र सामच्या हाती लागले आहे. या पत्रात त्यांनी मोठ-मोठ्या नेत्यांची नावे घेतली आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीएमार्फत घेतल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडवून दिली होती. आता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र साम टीव्हीच्या हाती आले आहे. या पत्रात त्यांनी मोठं-मोठ्या नेत्यांची नावे लिहिली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ माजलीय.

या पत्रातून सचिन वाझेने अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचे नाव असल्याचा उल्लेख केला आहे. अनिल देशमुख हे पीएद्वारे पैसे घेत असल्याचा आरोप वाझेने केल्यानंतर देशमुखांनी आरोप फेटाळून लावत वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर बोलतांना वाझेने देशमुख यांचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करुन घेतले. चांदीवाल समितीत मी जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोपही वाझे यांनी केलाय.

सचिन वाझेने फडणवीसांना पत्र लिहिलेल्याचा पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती समोर आलीय. सचिन वाझे हे मुंबई पोलीस दलातील गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी असाताना गैर कामे केली गेली. अवैध हुक्का पार्लर आणि भारतातील सर्वात मोठ्या वितरकास अटक केली असताना जयंत पाटील यांच्या शासकिय बंगल्यावरून आरोपींना सोडण्याबाबत तसेच त्या बदल्यात दुसऱ्याला अटक करण्याबाबत फोन आल्याचा दावा वाझेने आपल्या पत्रात केलाय. वाझेनी या आरोपाची ऑडिओ रेकॉर्डिंगही असल्याचा दावा केला असून सीडीआर द्वारेही माहिती समोर येईल असं म्हटलंय.

न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आला होता. या चांदीवाल समितीसमोर जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोपही वाझेने केलाय.

Sachin Waze: गृहमंत्री देशमुख पवारसाहेब जयंत पाटील यांच्या नावाने दबाव; वाझेने फडणवीसांना लिहिलेलं पत्र सामच्या हाती
Sachin Waze: सचिन वाझेचा राजकीय भूकंप; जेलमधील वाझे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com