'मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही.. काय व्हायचंय ते..'; मनोज जरांगे पाटलांकडून थेट इशारा

Manoj Jarange Continues Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली. मनोज जरांगे पाटील यांचा ठाम पवित्रा.
Manoj Jarange Continues Hunger Strike
Manoj Jarange Continues Hunger StrikeSaam
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस.

  • पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली.

  • जरांगे पाटील यांचा ठाम पवित्रा – “मेलो तरी मैदान सोडणार नाही.”

  • मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. कोर्ट आणि पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मराठा आंदोलकांना आझाद मैदान सोडायला सांगितले. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मेलो तरी, मागे हटणार नाही, असा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच मराठा बांंधवांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर मराठा बांधवांना संबोधित केलं. 'मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. काय व्हायचे ते होऊ द्या. त्याचे दुष्परीणाम ते जाणो अन् मराठे जाणो', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Continues Hunger Strike
Beed: पोलीस दलात खळबळ! निलंबित पोलीस निरिक्षकानं आयुष्य संपवलं, घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल

मराठा आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास झाला असल्याचं याचिकेतून नमुद आहे. यावरून मनोज जरांगेंनी मराठ्यांना आवाहन केलं आहे. 'मराठ्यांना शेवटचं सांगतो. गाड्या पार्गिंकला लावा. मैदानात लावा.. रेल्वे, एसटीने प्रवास करा.. कुठे गाड्या लावू देत नसतील तर, वाशीला लावा अन् रेल्वेने या.. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी शांतच राहायचे, वेड्यासारखे करायचे नाही. तुम्हाला माझी मया आहे, मला तुमची मया आहे. कितीही त्रास झाला तरी शांत राहायचे', असं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Continues Hunger Strike
CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा गोंधळ, रूळावर उतरून लोकल अडवली, VIDEO समोर

'मी मेल्याच्या नंतरही तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेत लढायची अन् जिंकायचीय. मी मरेपर्यंत हटणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतोय', असं जरांगे पाटील म्हणाले.

'कोर्टाच्या नियमाचे पोरांनो पालन करा. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, आपला आधार आहे. कोर्टाकडून आपल्याला परवानगी मिळेल, आपल्या बाजूने उभे राहील. आपल्या वेदनेत सहभागी होईल, आपल्यावर अन्याय करणार नाही', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange Continues Hunger Strike
'मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही.. काय व्हायचंय ते..'; मनोज जरांगे पाटलांकडून थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com