
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस.
आजपासून त्यांनी पाणी पिणं देखील बंद करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांच्या मते जरांगेंच्या शरीरात पाण्याची कमतरता असून प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
राज्यभरातून लाखो मराठा बांधव त्यांना पाठिंबा देत आंदोलनात सहभागी.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आजपासून मनोज जरांगे यांनी पाणी पिणं बंद करण्याचा निर्णय घेतला. रविवारी पत्रकारांशी संवाद साधाताना मनोज जरांगे यांनी ही मोठी घोषणा केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली होती. त्यांच्या शरिरात पाणी कमी असून त्यांनी जर पाणी सोडले तर त्यांची प्रकृती आणखी खालावेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी त्याग करणार आहेत. त्यात कालच डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी करत पाणी जास्त पिण्यास सांगितले आहे. तसंच ओआरएस घेण्यास सांगितले आहे. सध्या मनोज जरांगे यांची शुगर ही फक्त ७० च्या आसपास आहे. त्यामुळे त्यांनी पाणी त्याग केलास त्यांची प्रकृती आणखी खालावू शकते असे डॉक्टरांच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आझाद मैदानामध्ये लाखो मराठा बांधव दाखल झालेला आहे. तसेच कर्नाटकच्या बेळगावमधील सकल मराठा आणि मराठी क्रांती सीमा भाग मोर्चा संघटनेच्या माध्यमातून बेळगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे हजारो मराठा बांधव बेळगावमधून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानामध्ये हजर झाले आहेत.
मराठा बांधव दोन दिवस गैरसोय झाली होती. त्यानंतर राज्यभरातून माता-भगिनींकडून मराठा बांधव उपाशी राहू नये यासाठी भाकरी आणि ठेचा पाठवण्यात आला आहे. तसेच राज्यभरातून बिस्किट, पाण्याची बॉटल, कडधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू हे सर्व पाठवण्याचे काम करण्यात आले आहे. मराठा बांधवांची प्रकृती देखील बिघडत चालली आहे. अनेक मराठा बांधवांना व्हायरल ताप, पायला चिखल्या आणि ओली कपडे घातल्यामुळे त्वचा विकार होऊ लागला आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.