Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? सकल मराठा समाजानं केली Z प्लस सुरक्षेची मागणी

Manoj Jarange Patil Z Plus Security: जरांगे यांच्या जीवालाही धेका असू शकतो अशी भीती मराठा बांधवांनी व्यक्त केलीये. त्यामुळे सकल मराठा समाजानं जरांगेंसाठी Z प्लस सुरक्षेची मागणी केलीये.
Manoj jarange patil
Manoj jarange patilsaam Tv
Published On

भूषण अहिरे, धुळे

Dhule News:

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झटत असलेल्या मनोज जारांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj jarange patil
Kalyan Crime News: वडिलांच्या हत्येनंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी; मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यापूर्वी काम करणाऱ्या नेत्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्यात. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या जीवालाही धेका असू शकतो अशी भीती मराठा बांधवांनी व्यक्त केलीये.

त्यामुळे त्यांना प्रशासनाने झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. परंतु राज्य सरकारच्या समन्वय समितीने मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केल्यानंतर, सध्या त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं असलं तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा कायम ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी या समन्वय समितीला स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता सकल मराठा समाजाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

Manoj jarange patil
Sangli Crime: हॉटेलच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकत २ महिलांची केली सुटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com