
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा समागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत आज माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सरकारबाबतच वादग्रस्त विधान केले. 'शासन भिकारी आहे, शेतकरी नाही.', असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे माध्यमांना सांगतात की, 'शेतकऱ्यांकडून १ रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना १ रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडून १ रुपया शासन घेतं. म्हणजे भिकारी कोण शासन आहे तर शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी उलटा अर्थ केला आहे. १ रुपया ही किंमत फार थोडी आहे' माणिकराव ठाकरे यांनी सरकारबाबतच वादग्रस्त विधान केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत. विरोध आता त्यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.'
सुप्रिया सुळे यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुढे असे लिहिले की, 'एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.