एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचा बनाव! पुण्यात थेट पोलीस उपायुक्तांवर टाकला दबाव

Fake Osd Eknath Shinde Pune Arrest: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचे भासवून पोलीस उपायुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Accused arrested in Pune for posing as Deputy CM Eknath Shinde’s OSD and attempting to influence a police investigation.
Accused arrested in Pune for posing as Deputy CM Eknath Shinde’s OSD and attempting to influence a police investigation.Saam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचे भासवून पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे आरोपीचे नाव असून त्याने पुण्यातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावल यांच्या कार्यालयात जाऊन एका गुन्ह्याच्या तपासाबाबत आक्षेप घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचे सांगत त्याने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Accused arrested in Pune for posing as Deputy CM Eknath Shinde’s OSD and attempting to influence a police investigation.
Mumbai Metro: गुड न्यूज! ३ एप्रिलपासून मुंबईत २ नव्या मार्गावर मेट्रो धावणार, प्रवासाचा वेळ वाचणार; कुठून कसा कराल प्रवास?

मात्र पोलीस उपायुक्त रावले यांनी तातडीने खातरजमा केली असता संबंधित व्यक्ती तोतयागिरी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम 204 अंतर्गत गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com