संजय गडदे, मुंबई
मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. काल गोरेगाव पश्चिमेकडील इमारत आणि राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली. या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ पश्चिमेकडील एस.वी. रोडवरील धीरज हेरिटेज या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या तळघराला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सांताक्रुझ पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्याची माहिती मिळताच चार फायर इंजिन आणि एक रुग्णवाहिका, इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याी प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.
काल दिवसभरात मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. काल गोरेगावमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली.गोरेगाव पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. गोरेगाव पश्चिमेकडील एस वी रोड परिसरातील अनमोल टॉवर या उंच इमारतीला आग लागली होती.
तसेच काल गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली होती. याच परिसरातील गोडाऊनला ही आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमधील डिझेल गोडाऊन आणि स्क्रॅप साहित्याला ही आग लागली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.