Mumbai News : मुंबईत संशयास्पद व्यक्तीची घुसखोरी? तपास यंत्रणा सतर्क

मुंबईतून धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडी'वर धोकादायक व्यक्ती मुंबईत घुसल्याचा मेल आला आहे.
Mumbai News
Mumbai News Saam tv
Published On: 

सचिन गा़ड

मुंबई : मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडी'वर संशयास्पद व्यक्ती मुंबईत घुसल्याचा मेल आला आहे. या मेलनंतर मुंबईतील तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपसा यंत्रणेच्या 'ई-मेल आयडी' वर संशयास्पद व्यक्ती मुंबईत घुसल्याचा मेल आला आहे. या मेलनंतर खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला मेल मिळाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.

संशयास्पद व्यक्ती मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. सर्फराज मेमन असे मुंबईत (Mumbai) दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या माहितीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील (NIA) सतर्क झाली आहे.

Mumbai News
Mumbai Crime News : खेळता खेळता अचानक गायब झाली चिमुकली; सीसीटीव्ही फुटेज पाहून आई-वडिलांना धक्काच बसला!

मेलमध्ये काय म्हटलंय?

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आय डीवर संशयास्पद व्यक्ती मुंबईत घुसल्याचा मेल आला. इंदूरचा रहिवाशी असलेल्या या व्यक्तीने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँग येथे प्रशिक्षण घेतलं असून तो भारतासाठी संशयास्पद असल्याचा उल्लेख मेलमध्ये आहे. संशयिताचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपी मेलमध्ये जोडलेले आहे.

Mumbai News
Weather Update : देशातील ६ राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; जाणून घ्या, आज कसं असेल हवामान?

राष्ट्रीय तपास यंत्रणाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दल सतर्क झालं आहे. मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांशी देखील संपर्क साधला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या मुंबई कार्यालयातील ईमेल आयडीवर मेल आला होता. या मेलनंतर तपास यंत्रणेने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोरेगाव पार्कातील गुगल ऑफिसमध्ये (Koregaon Park) बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली होती. या खोट्या कॉलमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com