

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सचिन सानप यांनी उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत 5 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांचा प्रतिनिधी असावा, अशी भूमिका सानप यांनी मांडली आहे.
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघानंतर आता भाजपला पुण्यातील शिक्षक मतदारसंघातही मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. सचिन सानप यांनी भाजपच्या निर्णयावर आक्षेप घेत महायुतीला इशारा दिलाय. महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होती.अखेर वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. भाजपनं येथे एका संस्थाचालकाला उमेदवारी दिल्यानं मंत्री उदय सामंत यांचे नीकटवर्तीय असलेले सचिन सानप नाराज झालेत.
भाजपच्या निर्णयाला विरोध करत त्यांनी थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. संस्थाचालकाला उमेदवारी दिल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सचिन सानप उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीला ५८ तालुक्यांत एकही शिक्षक उमेदवार मिळाला नाही का? भाजपने जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये भाजपला एकही शिक्षक उमेदवार भेटला नाही का? ज्यामुळे संस्थाचालकांना उमेदवारी द्यावी लागली, असा खडा सवाल सानप यांनी यावेळी केलाय.
महायुतीविरोधात संताप व्यक्त करताना सानप म्हणाले की, उद्या सोमवारी दुपारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. माध्यमांशी संवाद साधताना सचिन सानप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची माफी मागितली. आपण आता पुढील निर्णय शिक्षक संघटनांशी बोलून घेणार आहोत. भाजपनं संस्थाचालकाला उमेदवारी दिल्यानं शिक्षक संघटना नाराज झाल्या आहेत. सानप म्हणाले की, उमेदवारी कोणालाही द्या पण तो उमेदवार शिक्षक असला पाहिजे, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केलीय.
सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकाला प्रतिनिधी असावा अशी त्यांची मागणी आहे. येत्या 5 तारखेला म्हणजेच उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून उमेदवारीचा निर्णय झाला नाहीतर शिक्षक संघटनांच्या आग्रहाखातर आणि विश्वासावर निवडणुकीला सामोरं जावं लागेल, असं सचिन सानप म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.