Tushar Gandhi : महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Tushar Gandhi Arrest Mumbai Police : महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना मुंबईतील वांद्रे येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महात्मा गांधी यांचे नातू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना मुंबईतील वांद्रे येथील नॅशनल कॉलेज परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर गेल्या तीन ते चार तासांपासून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तुषार गांधी यांना वांद्रे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सांताक्रूझ आणि जुहू येथील पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आल्याचे समजते. सध्या त्यांना अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला तुषार गांधी यांनी पाठिंबा दिला होता. तसेच, दादर येथे ४ तारखेला झालेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते दरम्यान, तुषार गांधी यांना गेल्या तीन ते चार तासांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेले जात असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com