Vidhan Sabha Election 2024: दोन वर्षांपूर्वी भाजपमुळे निवडणुकीतून माघार, पुन्हा एकदा आमदारकीची तयारी, मुंबईतील बडा नेता शिंदेंच्या भेटीला

Murli Patel Meets CM Eknath Shinde: अंधेरी पूर्वमधील भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Vidhan Sabha Election 2024: अंधेरी पूर्वसाठी युतीत रस्सीखेच, भाजप नेत्यानं थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा
CM Eknath ShindeSaam Tv
Published On

वैदेही काणेकर, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. नाराज नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. अशातच भाजपचे अंधेरी पूर्वमधील उमेदवार मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरी ही भेट झाली. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुरजी पटेल हे इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली. या भेटीनंतर मुरजी पटेल हे शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीत ऋुतुजा लटकेंच्या विरोधात भाजपकडून मुरली पटेल यांनी अर्ज भरला होता. मात्र एनवेळी भाजपने पटेल यांना अर्ज मागे घ्यायला लावला. तेव्हापासून मुरली पटेल हे नाराज असल्याचे बोललं जात आहे. तसंच युतीत अंधेरी पूर्वची जागा वाटपात शिवसेनेला सुटण्याची चिन्ह असल्याने मुरली पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Vidhan Sabha Election 2024: अंधेरी पूर्वसाठी युतीत रस्सीखेच, भाजप नेत्यानं थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा
Ramdas Kadam : सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल आहेत? रामदास कदम यांनी भरसभेत सर्वच उघड केलं

अंधेरी पूर्वच्या जागेसाठी मुरली पटेल हे इच्छुक असले तरी या जागेसाठी इन्काऊट स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्विकृती शर्माही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्विकृती शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलींसह शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरून आता अंधेरी पूर्व जागेसाठी युतीतच जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Election 2024: अंधेरी पूर्वसाठी युतीत रस्सीखेच, भाजप नेत्यानं थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा
Mahayuti Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३१ जागा लढवणार, सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com