Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Politics BJP Corporators Join Shinde-Led Shiv Sena : एका मोठ्या राजकीय बदलात, मुरबाडमधील आठ भाजप नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि भविष्यातील निवडणुकांपूर्वी ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Thane Politics BJP Corporators  Join Shinde-Led Shiv Sena
Thane Politics: Shinde’s masterstroke as 8 BJP corporators from Murbad join Shiv Sena, big blow to BJP.saam Tv
Published On
Summary
  • मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे ८ नगरसेवक शिंदे गटात दाखल.

  • विकासकामांसाठी निधी न मिळाल्याचा नगरसेवकांचा आरोप.

  • भाजपला ठाण्यात मोठा धक्का, शिवसेनेचा शिंदे गट बळकट.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झालीय. विकासासाठी निधी मिळत नसल्याच्या कारणाने भाजपच्या माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलाय. नगरपंचायतीतील १७ सदस्यांपैकी भाजप परिवर्तन पॅनलमधील तब्बल ८ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. यामुळे एकनात शिंदेंनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. यामुळे मुरबाडमधील राजकीय समीकरणात मोठा बदल झालाय. आगामी काळातील राजकारणावर त्याचा परिणाम होणार असल्याचं बोलले जात आहे.

भाजपकडून विकासकामांसाठी निधी न देणे, जाणूनबुजून कामे रखडून ठेवणं. यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने आणि जनसंपर्काने प्रेरित होत शिवसेनेत प्रवेश केल्याचं नगरसेवकांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील , शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख देवानंद थळे, मारुती धिरडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

Thane Politics BJP Corporators  Join Shinde-Led Shiv Sena
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

दुसरीकडे भिवंडीतील पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. माजी नगराध्यक्ष रामभाऊ भगवान दुधाळे, उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास वारघडे, गटनेते मोहन भालचंद्र गडगे, बांधकाम सभापती उर्मिला सुजित ठाकरे, पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर आंबवणे, नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव, रविना विनायक राव, अनिता संतोष मारके, तसेच इतर कार्यकर्ते विकास वारघडे, सुजित ठाकरे आणि नंदकुमार जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Thane Politics BJP Corporators  Join Shinde-Led Shiv Sena
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा जोरदार इशारा; विरोधकांनो, शिवसेना कधीही फुटणार नाही|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com