Maharashtra Tempraure
Maharashtra TempraureSaam Tv

Maharashtra Weather News: राज्यात पुढील १५ दिवस उष्णतेची लाट; पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात मोठी वाढ होणार

Pune, Solapur, Marathwada Weather News: राज्यात पुढील १५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे.

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Heat Wave In Pune, Madhya Maharashtra And Marathwada

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंगाची लाही लाही (Maharashtra Weather) होत आहे. तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता राज्यात पुढील १५ दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ (Heat Wave) होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

येणारा काळ हा निवडणुकीचा आहे. त्यामुळे या काळात मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी १० ते दुपार ३ पर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवणार आहे. त्यामुळे जर काही अत्यंत महत्त्वाचे असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडणं टाळा, असं आवाहन पुणे वेध शाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलं (Maharashtra Tempraure) आहे. एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात तापमान कसं राहील? या संदर्भात के. एस. होसाळीकर यांच्याशी साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा ताप वाढू लागली आहे. मालेगाव, विदर्भातील ब्रह्मपुरी, मध्य महाराष्ट्रातील जेऊर आणि सोलापूर या शहरांमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर गेला (Latest Weather Update) आहे. आता राज्यात पंधरा दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे.

५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार होण्याचा, हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ४२ अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी (Heat Wave In Pune) घ्यावी, असं आवाहन पुणे वेध शाळेकडून करण्यात आलं आहे. राज्यात पुढील १५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे.

Maharashtra Tempraure
Maharashtra Heat Wave: राज्यात उष्णतेची लाट; मालेगावमध्ये 40.6 अंश तापमानाची नोंद, पुण्यात उकाडा वाढला

मराठवाडा, पूर्व विदर्भ, कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असणार आहे. राज्यात निरभ्र आकाश आहे. दिवसा उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत (Tempraure) आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्रीवेळी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला होता. दिवसा मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी घराबाहेर पडणं तापदायक ठरत (Heat Wave In Marathwada) आहे.

Maharashtra Tempraure
Heat Wave Precautions : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! रखरखत्या उन्हापासून वाचण्यासाठी या टीप्स फॉलो करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com