Heat Wave Precautions : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! रखरखत्या उन्हापासून वाचण्यासाठी या टीप्स फॉलो करा

How To Prevent Heat Wave : उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या मौसमात आपल्या राहाणीमानात आणि आहारात फार बदल होतात.
Heat Wave Precautions
Heat Wave PrecautionsSaam tv

Summer Care Tips :

उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या मौसमात आपल्या राहाणीमानात आणि आहारात फार बदल होतात.

हिवाळा संपताच आपण गरम कपडे आणि तेलकट पदार्थांना मागे टाकून सुती कपडे आणि हलका आहाराकडे (Food) विशेष लक्ष देतो. एप्रिल महिना सुरु होताच पहिल्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD)ने एप्रिल-जून या तिमाहीत उन्हाच्या अधिक झळा सोसाव्या लागणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढण्याचा धोका देखील सांगितला आहे. रखरखत्या उन्हापासून (Summer Season) वाचण्यासाठी या टीप्स (Tips) फॉलो करा

Heat Wave Precautions
Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!
  • उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी, ताज्या फळांचा रस आणि नारळ पाणी प्या.

  • आवश्यक असल्यास घराबाहेर पडा. घराबाहेर जाताना स्कार्फ, छत्री, टोपी आणि सनग्लासेसचा वापर करा.

  • शारीरिक हालचाली कमी करा. बाहेर जाताना स्कार्फने तोंड झाका.

  • उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. तसेच उन्हात घराबाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर करा.

  • उन्हाळ्यात रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. उन्हाळ्यात चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी आणि थकवा अधिक प्रमाणात जाणवतो. ही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • सूर्याच्या अतिनिल किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी कमीतकमी एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन लावा, सनग्लासेस घाला.

  • आहारात कैरीचे पन्हं, ताक, लस्सी, दही, कच्चा कांदा, लिंबूपाणी यांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com