MLC Elections Postponed: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली, राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निर्णय

Graduate and teachers constituency postponed : राजकीय पक्षांच्या मागणीनंतर या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
MLC Elections Postponed: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली, राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निर्णय
Teacher Constituency ElectionSAAM TV

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या मागणीनंतर या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यातच म्हणजे १० जून रोजी ही निवडणूक होणार होती.

निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर केल्या होत्या. आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या केल्या होत्या. चार जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार असल्याने निवडणुका जाहीर केल्या होत्या.

MLC Elections Postponed: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली, राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निर्णय
Ghatkopar Hoarding Accident: घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे कोण आहे?, 2009 मध्ये लढवली विधानसभा निवडणूक

१० जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार होतं. ८ मे रोजी या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आज १४ मे रोजी या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी जागा मिळविण्यासाठी चढाओढ सुरु केली होती. मात्र, राजकीय पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

MLC Elections Postponed: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली, राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निर्णय
Ravindra Dhangekar : पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकी काय आहेत कारणं?

शिक्षकांच्या मताचा अधिकार सुरक्षित

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन आयोगाकडे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तर हायकोर्टात याचिकाही केली होती. तसेच इतर राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com