Ghatkopar Hoarding Accident: घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे कोण आहे?, 2009 मध्ये लढवली विधानसभा निवडणूक

Who Is Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case: पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case
Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump CaseSaam Tv

घाटकोपर येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भलेमोठे होर्डिंग (Ghatkopar Hoarding Case) पेट्रोल पंपावर पडले. या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला तर ७४ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. हा भावेश भिंडे नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत...

भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल

भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे. या कंपनीनेच घाटकोपर येथे हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा मुलुंड येथे राहतो. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यासाठी मुलुंड येथील त्याचे घर गाठले. पण त्यााचा फोन बंद लागत असून तो घरामध्ये नसल्याचे समोर आले. भावेश भिंडे फरार असून पोलिसांची टीम सध्या त्याचा शोध घेत आहे.

Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case
Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

कोण आहे भावेश भिंडे?

भावेश भिंडे हा गुज्यू अ‍ॅड्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. भावेश भिंडेचे वडील रिक्षाचालक होते. भावेशच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याने अ‍ॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचे काम केले होते. पण वडील निधनानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९९३ मध्ये त्याने होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याने आपला व्यवसाय वाढवला. त्याला या व्यवसायामध्ये यश देखील आले. त्यामुळे हळूहळू तो एक एक स्टेशन पुढे गेला. त्याने ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटुंगा आणि परेलपर्यंत आपला व्यवसाय वाढवला.

Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case
Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई; मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीएमसीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

२००९ मध्ये लढवली निवडणूक

विशेष म्हणजे भावेश भिंडे हा नववी फेल आहे. त्याने आपला व्यवसाय कशाच्या जीवावर वाढवला असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत त्याने या व्यवसायात घोटाळा केल्याचा देखील आरोप केला जात आहे. महत्वाचे म्हणजे भावेशने या व्यवसायाद्वारे प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर त्याने २००९ मध्ये मुलुंडमधून आमदारकीसाठी विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्याने अपक्ष म्हणून लढवली होती.

Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case
Ghatkopar Hording Collapse: दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले; VIDEO व्हायरल

भावेश भिंडेविरोधात २१ गुन्हे

धक्कादायक बाब म्हणजे, त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सुमारे २१ गुन्हे असल्याचं नमूद केले होते. त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेले २१ गुन्हे हे विनापरवानगी होर्डिंग्स लावल्याबद्दल आहेत. महापालिका कायदा अंतर्गत ३२८ कलमांतर्गत त्याच्यावर २१ गुन्हे हे २००९ पर्यंत दाखल होते. मग हा प्रश्न निर्माण होतो की एवढे गुन्हे दाखल असलेल्या साईन बोर्डच्या मालकाला घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग लावण्यास रेल्वे पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? आता या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case
Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग दुर्घटनेशी त्यांचा संबंध काय? भाजपने ठाकरेंचा फोटो एक्स-पोस्ट केल्यानंतर भुजबळांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com