Teacher Salary: गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार रखडणार, सरकारने वेतन का अडवले? वाचा

Teachers Salary Will Be Delayed: राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार लवकर व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र, आता हे वेतन होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
Teacher Salary
Teacher SalarySaam Tv
Published On

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षकांचा पगार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर मिळावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र, यामध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

Teacher Salary
Teacher Bharti: गुड न्यूज! सर्वात मोठी शिक्षक भरती होणार, १० हजार शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने घेणार

शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता सर्व खाजगी अनुदानित शाळांना मुख्याध्यापकांना त्यांच्याकडील शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. याशिवाय पगार मिळणार नाही, असे आदेश वेतन अधीक्षकांनी काढलेआहेत.

दर महिन्याला शिक्षकांच्या पगारासाठी २० तारखेपूर्वी निधी वितरित केला जातो. परंतु आता गणेशोत्सवामुळे पगार लवकरच करण्याची मागणी केली जात आहे. ऑगस्ट वेतनाचा निधी दोन ते तीन दिवसात वितरित केला जाईल. परंतु शिक्षकांची सर्व कागदपत्रे अपलोड केली जाणार नाही. तोपर्यंत पगार होणार नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१२ पासूनची कागदपत्रे शिक्षण विभागाने मागवली आहे. शालांच्या मुख्याध्यापकांना ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. दरम्यान, जे मुख्याध्यापक हे कागदपत्रे अपलोड करणार नाहीत, त्या कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही.

Teacher Salary
Zp School : मराठी सोबतच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही धडे; मावळच्या जिल्हा परिषदे शाळेचा अभिनव उपक्रम

राज्यातील खाजगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पावणेपाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे.यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी तीन महिने लागणार आहेत.

Teacher Salary
Maharashtra Teachers : राज्यातील बोगस शिक्षकांवर कारवाई, कागदपत्रांची पडताळणी होणार; आतापर्यंतचे वेतन परत घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com