Maharashtra SSC Result 2024 : दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती

Maharashtra State Board 2024 Result Date : विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर ठरली आहे. शिक्षण बोर्डाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती
ssc, school, maharashtra, ssc marksheet, ssc resultsaam tv

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली आहे. येत्या २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे.

दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना होती.

 दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती
Maharashtra 12th Result 2024: बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी; वाचा निकालाची ५ महत्वाची वैशिष्ट्ये

मात्र, आता ही उत्सुकता संपली असून दहावी परीक्षेचा निकाल २७ मे २०२४ रोजी लागणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती.

पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागातील जवळपास १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. विशेष बाब म्हणजे राज्यातील बऱ्याच परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा झाल्या होत्या.

महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन विद्यार्थी २७ तारखेला दहावीचा ऑनलाइन निकाल बघू शकतील. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट असणे आवश्यक आहे. परीक्षा क्रमांक टाकून विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकतात.

विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दहावीच्या निकालाची सर्वच विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता होती. दरम्यान दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती
Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com