Maharashtra Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना रेड अलर्ट
Maharashtra Weather Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीसाठी पूरक असा पाऊस कधी पडणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा पाऊस सक्रिय हो असून येत्या तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस (Weather Updates) पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. गुरूवारी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर आकाश पूर्णतः ढगाळ तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या काळात घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविला आहे.
उद्या कोकणाला रेड अलर्ट जारी
हवामान खात्याने कोकणाला रेड अलर्ट (Monsoon 2023) जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा
गुरूवारी मुंबईसह (Mumbai Rain) ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाडा विदर्भाला यलो अलर्ट
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

