ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Senior ShivSena UBT Leader Resigns: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राजीनामा दिला असून भाजप प्रवेशाची चर्चा आहे.
Political turmoil intensifies in Pimpri-Chinchwad as Shiv Sena (UBT) city chief resigns ahead of civic elections.
Political turmoil intensifies in Pimpri-Chinchwad as Shiv Sena (UBT) city chief resigns ahead of civic elections.Saam Tv
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड: राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असताना मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. आजी, माजी आणि भावी नगरसेवक हे आपल्या सोयीनुसार पक्षांतर करताना दिसत आहे. आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार या सर्वच उमेदवारांमध्ये इतका ठासून भरला आहे की त्यांना सत्ताधारी पक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागतोय. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे.

Political turmoil intensifies in Pimpri-Chinchwad as Shiv Sena (UBT) city chief resigns ahead of civic elections.
Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

राज्यातील अनेक माजी आमदार, माजी नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मागच्या काही दिवसांपासून तर भाजप विरोधीपक्षासह मित्रपक्षाला देखील सुरुंग लावत आहे. असे असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. ठाकरेंच्या एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

Political turmoil intensifies in Pimpri-Chinchwad as Shiv Sena (UBT) city chief resigns ahead of civic elections.
पुणेकरांचा प्रवास होणार गारेगार; इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच सेवेत, कोणत्या मार्गांवर धावणार जाणून घ्या

कोणी दिला राजीनामा? पिंपरी चिंचवडच्या राजकारणात खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच कमळ हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना वाघेरे यांनी हा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांत त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाते हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

Political turmoil intensifies in Pimpri-Chinchwad as Shiv Sena (UBT) city chief resigns ahead of civic elections.
शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे लेखी प्रस्ताव

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लेखी प्रस्ताव सादर केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आम्हाला किमान 20 जागा देण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसने या प्रस्तावातून केली आहे. काँग्रेस पक्षाच्या मते, शहरातील सुमारे 20 प्रभागांमध्ये पक्षाची चांगली ताकद असून या प्रभागांमध्ये उमेदवारी देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत स्थानिक परिस्थितीचा विचार करून जातीयवादी भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका काँग्रेसने प्रदेश स्तरावर घेतली आहे. काँग्रेसचा प्रस्ताव आमच्याकडे आला असून याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com