

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर चहूबाजूनींं टीका करण्यात येत होती
मात्र, आता येत्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप दोन महिला आमदारांना संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एक कॅबिनेट तर एका महिला आमदाराला राज्य मंत्री पद मिळणार आहे.माधुरी मिसाळ आणि देवयानी फरांदे यांच नाव आघाडीवर आहे तर मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या देखील इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील पाहा -
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांनी शपत घेतली
राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ मंत्र्यांनी शपत घेतली. शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपत घेतली.
तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपत घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.