Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं

Sachin Aahir join Shindesena: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील विश्वासू आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेची साथ सोडली. त्यांनी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं
Eknath Shinde And Uddhav ThackeraySaam TV Marathi News
Published On
  • एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का

  • सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला

  • विधान परिषद उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट

  • शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र

मुंबईतून आताची सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला. ठाकरेंचे विश्वासू आमदार सचिन अहिर हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्कातंत्र दिलं. शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. उपसभापती निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चर्चा आता सुरू आहे. ८ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या ६ खासदारांना फोडले. त्यानंतर त्यांनी थेट विधान परिषदेतील आमदाराला फोडलं. सचिन अहिर यांनी अचानक साथ सोडल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

उपसभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आता सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करत असताना सचिन अहिर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित होते.

अर्ज संख्याबळानुसार महायुतीने शिवसेना शिंदेगटाला उपसभापतीचे पद सोडले. शिंदेगटामध्ये या पदासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिंदेंना ठाकरेकडून धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना ठाकरेगटाकडून जगन्नात अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळाचा विचार केला तर शिंदेसेनेकेडे जास्त संख्याबळ आहे. ही निवडणूक बिनविरोधत होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

दरम्यान, अरुण गवळी यांचा भाचा अशी सचिन अहिर यांची ओळख होती. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. सचिन अहिर यांनी नेहमी उद्धव ठाकरे यांना कठीण काळात साथ दिली. सचिन अहिर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच त्यांची राजकीय कारकिर्द घडली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मुंबई अध्यक्षपद आणि मंत्रिपद देखील सांभाळले. राष्ट्रवादीची साथ सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं
Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com