Sharad Pawar News: अजित दादांना शह देण्यासाठी शरद पवारांचा नवा डाव; जुन्नर विधानसभेसाठी मिळाला युवा शिलेदार?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा नव्याने पक्षबांधणी करण्याचे मोठे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्याचदृष्टीने मोर्चेबांधणी करताना शरद पवार नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
Sharad Pawar Update News
Sharad Pawar Update NewsSaam TV
Published On

Maharashtra Politics News:

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा नव्याने पक्षबांधणी करण्याचे मोठे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्याचदृष्टीने मोर्चेबांधणी करताना शरद पवार नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Crisis) गट पडल्यानंतर शरद पवारांनी शिरुर लोकसभा मतदार संघासह विधानसभेवर विशेष लक्ष केंद्रीत केलय या निमित्ताने पवारांकडुन लोकसभेसह विधानसभा मतदार संघात आढावा घेतला जात आहे. याच निमित्ताने आज (१३, जानेवारी) जुन्नरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मेळावा संपन्न होत आहे.

विघ्नहर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची विस्तारीकरण लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) शेतक-यांना संबोधित करणार आहेत. शरद पवार गटाकडुन यापुर्वी अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) माध्यमातून लोकसभेची तयारी सुरु असताना विधानसभेचीही मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Update News
Kite Festival In Nandurbar: रंगीबेरंगी पंतगांनी नंदुरबारची बाजारपेठ सजली, तीन दिवस महाेत्सवाची धूम; युवा वर्गात दांडगा उत्साह

अतुल बेनकेविरुद्ध सत्यशिल शेरकरांना संधी?

विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकरांचे (Satyashil Sherkar) भावी आमदार म्हणुन झळकलेले बॅनर सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. एकीकडे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतली असतानाच या बॅनरमुळे बेनकेंविरुद्ध शेरकरांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत पवारांकडून तरुण चेहरे समोर काढले जात असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Update News
Kharkopar-Uran train: खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर ४० लोकल फेऱ्या, वेळापत्रकही आलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com