Maharashtra Politics: विधानसभेसाठी शरद पवार गटानं रणनिती आखली; पहिला डाव टाकला, २८८ मतदारसंघांसाठी घेतला मोठा निर्णय

Sharad Pawar Group Appointed Inspector For Vidhan Sabha: विधानसभेसाठी शरद पवार गटानं रणनिती आखली आहे. २८८ मतदारसंघांसाठी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय.
शरद पवार गट
Sharad Pawar groupSaam Tv
Published On

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले डाव टाकायला सुरूवात केलीय. शरद पवार गटाने देखील २८८ मतदारसंघांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेसाठी शरद पवार गटाची रणनिती समोर आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट युवककडून २८८ निरीक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

विधानसभेसाठी शरद पवार गटाची रणनिती

कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडून राज्यातील २८८ मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील स्थानिक पातळीवर पक्षाचं काम करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्याची निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात (Maharashtra Politics) आलीय.

मोठा निर्णय

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar group) वतीने मेहबूब शेख यांनी नियु्क्तीबाबत पत्र पार्टीतील पदाधिकाऱ्यांना पाठवलंय. या पत्रात म्हटलं गेलंय की, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षासाठी आजपर्यंत आपण दिलेलं योगदान लक्षात घेतलं जात आहे. त्यावरू विधानसभा जिल्हा पदावर निरीक्षक नियुक्ती करण्यात येत आहे.

शरद पवार गट
Sharad Pawar: '...तरच लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा किंमत मोजावी लागेल', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान!

२८८ मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नेमणूक

पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम प्रकारे कराल. तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी आपण योगदान द्याल, असा ठाम विश्वास पत्राद्वारे मेहबूब शेख यांनी व्यक्त केलाय. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पक्षाची ध्येय, धोरणे तसेच शरद पवार साहेब (Vidhan Sabha Election 2024) यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. तसंच निवडीबद्दल त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली (Maharashtra Assembly Election) आहे. आजपासून उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर शरद पवार गटाने २८८ मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नेमणूक केलीय.

शरद पवार गट
CM Shinde Meet Sharad Pawar: मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची अर्धा तास बैठक; मराठा आरक्षणाबाबत झाली महत्त्वाची चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com