Sharad Pawar: '...तरच लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा किंमत मोजावी लागेल', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान!

NCP Chief Sharad Pawar Press Conference: आगामी विधानसभा निवडणुका, पक्षाच्या रणनिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याचा समाचार घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
Sharad Pawar: '...तरच लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा किंमत मोजावी लागेल', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान!
Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे| छत्रपती संभाजीनगर, ता. २७ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार कालपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, आगामी विधानसभा निवडणुका, पक्षाच्या रणनिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभेला लोकसभेसारखा निकाल लागणार का? याबाबत सर्वात महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?

"मराठा आरक्षणासंबंधी मतभेद असण्याचे कारण नाही. मात्र दोन वर्गांमध्ये एक प्रकारचे अंतर वाढते की काय याची मला काळजी आहे, अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. मला काहींनी सांगितलं की विशिष्ट समाजाच्या हॉटेलमध्ये काही वर्ग जात नाही, हे चिंताजनक आहे, हे बदलण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर प्रयत्न करावे लागतील," असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर भूमिका काय?

तसेच "मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा असा आमचा आणि माझ्या पक्षाचा आग्रह आहे. सर्वांशी सुसंवाद करुन मार्ग काढावा, अशी आमची भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले. तसेच रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर यावे. ज्यांची ज्यांची योग्य रस्त्यावर येण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागत आहे," असे म्हणत शरद पवार यांनी पक्षातील इनकमिंगबाबत महत्वाचे विधान केले.

Sharad Pawar: '...तरच लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा किंमत मोजावी लागेल', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान!
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू शिलेदार शरद पवार गटात प्रवेश करणार

विधानसभेच्या निकालावर मोठे विधान!

"तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. लोकांना बदल हवा आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, उद्याच्या निवडणुकीत आपल्याला संधी आहे, पण लोकसभेला निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही जे एकसंघ चित्र उभं केलं. ती प्रक्रिया पुर्ण झाली त्याला मूर्त स्वरुप देण्याची गरज आहे. तसे मुर्तस्वरुप आले तर लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल," असे मोठे विधान शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar: '...तरच लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा किंमत मोजावी लागेल', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान!
Nashik Crime: जेलमधून सुटताच 'रोड शो', आता भररस्त्यातून निघाली धिंड, नाशिकच्या 'बॉस'ची पोलिसांनी जिरवली; मिरवणूक अंगलट आली!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com