MNS leader Raju Patil addressing the media on the MNS–UBT alliance for Kalyan-Dombivli civic elections.
MNS leader Raju Patil addressing the media on the MNS–UBT alliance for Kalyan-Dombivli civic elections.Saam Tv

वारं फिरलं! सोडून गेलेल्यांचे पुन्हा फोन, उमेदवारी मिळणार का? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं

MNS UBT Alliance In Kalyan Dombivli: केडीएमसी निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना उबाठा युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली असून, पक्ष सोडून गेलेल्यांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Published on
Summary

केडीएमसी निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना उबाठा युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मनसे नेते राजू पाटील यांनी दिली.

या युतीअंतर्गत मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवणार असून, मराठी मतांची ताकद एकत्र आणणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युती ठरल्यानंतर पक्ष सोडून गेलेल्यांचे फोन येत असल्याचा दावा करत, त्यांच्यासाठी आता दरवाजे बंद असल्याचे राजू पाटील म्हणाले.

उबाठा-मनसे युतीमुळे केडीएमसी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार असून महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मनसेचे नेते राजू पाटील यांनी दिली आहे. या युतीअंतर्गत मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MNS leader Raju Patil addressing the media on the MNS–UBT alliance for Kalyan-Dombivli civic elections.
Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, मराठी मतांची ताकद एकत्र आणण्यासाठी उबाठा मनसे युती निर्णायक ठरणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन जागावाटपावर एकमत झाले असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा कल्याण डोंबिवलीत आयोजित करण्यात येणार आहे.

MNS leader Raju Patil addressing the media on the MNS–UBT alliance for Kalyan-Dombivli civic elections.
वंचित बहुजन आघाडीशी युती होताच काँग्रेसला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

या सभेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, जे आमच्यातून गेले होते त्यांचे पुन्हा फोन येत आहेत, मात्र त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद आहेत, अशा शब्दांत राजू पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. युती ठरल्यानंतर अनेकांची भूमिका बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

MNS leader Raju Patil addressing the media on the MNS–UBT alliance for Kalyan-Dombivli civic elections.
BMC Election : मुंबईत प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचं बळ वाढलं; 'वंचित'चे उमेदवार कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढणार?

जैन मुनीन वर बोलताना राजू पाटील म्हणाले मुनींनी त्यांचं काम करावं ,राजकीय सुपाऱ्या घेऊ नये असा सल्ला मनसे नेते राजू पाटील यांनी जैन मुनींना दिला आहे. उबाठा मनसे युतीच्या या निर्णयामुळे केडीएमसी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असून, महायुती आणि इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com