वंचित बहुजन आघाडीशी युती होताच काँग्रेसला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

BMC ElectionS 2026 : वंचित बहुजन आघाडीशी युती होताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे.
Maharashtra Politics
congress news Saam tv
Published On
Summary

ऐन निवडणुकीत काँग्रेसला बसला मोठा धक्का

काँग्रेसचे आदिवासी समाजाच्या नेत्याचा पक्षाची साथ सोडली

काँग्रेस नेत्याने मेल करत वरिष्ठांकडे सोपवला पदाचा राजीनामा

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. या दोन्ही पक्षांची युती २ जागांवरून रखडली होती. मात्र, या दोन जागांवरून काँग्रेसने माघार घेतली. त्यानंतर दोन्ही जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्या आहेत. यावरून काँग्रेसचे आदिवासी समाजाच्या नेत्याने नाराजी दर्शवत राजीनामा दिला आहे. या नेत्याच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या जागावाटपासाठी अनेक राजकीय पक्षांचा बैठकांचा सपाटा सुरू आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाची युती होणार असून अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर याच निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली. परंतु या युतीमुळे काँग्रेसचे मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनिल कुमरे नाराज झाले आहेत.

Maharashtra Politics
सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; क्रीडाविश्वावर शोककळा

काँग्रेसने महापालिकेत आदिवासींसाठी राखीव असलेले वार्ड क्र. 121 आणि 53 वंचित बहुजन आघाडीसाठी सोडल्याने नाराज आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी राजीनामा दिला आहे. युती करताना स्थानिक आदिवासी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Politics
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 55.88 कोटींचे एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त

आरे कॉलनीत पक्ष उभा ठेवण्यासाठी दीर्घकाळ काम करूनही अन्याय झाल्याचे कुमरे यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांना निधीबाबत विचारून पक्ष नेत्यांनी अपमान केल्याचा आरोपही कुमरे यांनी केला. या कारणांमुळे त्यांनी सर्व पदांचा राजीनामा वरिष्ठांकडे मेलद्वारे पाठवला आहे. कुमरे राजीनामा वरिष्ठांकडे सोपवल्यानंतर काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com