Atul Deshmukh and supporters join Shinde Sena ahead of Pune civic polls : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आचारसंहिता लागताच २४ तासांच्या आत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुण्यात ताकद असणारे देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गुरूवारी चाकणमध्ये होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. (Major setback to Sharad Pawar as Pune NCP leaders defect)
पुण्यासह राज्यभरात कार्यकर्ते, पदाधिकारी दिग्गज नेते साथ सोडून जात असल्याने निवडणुकीआधीच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी होत आहे. उत्तर पुण्यातील पवारांचे शिलेदार अतुल देशमुख शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार आहेत. चाकणमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थित गुरूवार देशमुख यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच उत्तर पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठं खिंडार पडले आहेत. अतुल देशमुखांसह नगरसेवक आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती होणार आहे. अतुल देशमुख यांची उत्तर पुण्यात मोठी ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.
नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह अमोल कोल्हेंचा खंदा समर्थक असणारा नेता साथ सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहे. उद्या चाकणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेऊन पक्ष प्रवेश होणार आहे. अतुल देशमुख यांच्यासोबत राजगुरुनगर, आळंदी, चाकण नगरपालिकांचे नगरसेवक,पंचायत समिती सदस्य, हजारो कार्यकर्ते धनुष्यबाण हाती घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने मोठे बळ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.