Maharashtra Politics: आपण कुठे कमी पडलो? शिवसेनेकडून पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा

Shivsena Shinde Group Meeting: वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकित विधानसभा निवडणूकींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पराभूत उमेदवारांना सूचना देखील देण्यात आल्या.
Maharashtra Politics: आपण कुठे कमी पडलो? शिवसेनेकडून पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा
Shivsena Shinde Group Meetingtwitter
Published On

वैदेही काणेकर, मुंबई

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. पण महायुतीमधील शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. या पराभूत उमेदवारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. वर्षा बंगल्यावर नुकत्याच झालेल्या या बैठकित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव आढसूळ, रामदास कदम, दादा भूसेंसह इतर नेते देखील उपस्थित होते. शिवसेना नेत्यांच्या बैठकित विधानसभा निवडणूकींचा आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणूकीत पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारण मिमांसा शिवसेनेकडून शोधली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये काही उमेदवारांच्या झालेल्या पराभवाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. उमेदवारांनी या पराभवातून खचून न जाता, त्यामागची कारणं शोधावी. नेमका का पराभव झाला? आपण कुठे कमी पडलो? महायुतीचा धर्म पाळला गेला का? पक्षांतर्गत नेते पदाधिकारी या पराभवाला कारणीभूत आहेत का? याचा अहवाल बनवून काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना पराभूत उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Politics: आपण कुठे कमी पडलो? शिवसेनेकडून पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा
Maharashtra Politics : मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार, भाजपमध्ये धाकधूक वाढली, फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग

बैठकीमध्ये देण्यात आलेल्या या सूचना लक्षात घेऊन पुढील निवडणूकांमध्ये या चूका टाळून पक्षाकडून यशस्वी नियोजन केले जाईल. तसेच युतीधर्म न पाळला गेला असल्यास त्यासंदर्भात कडक पावले उचलली जातील. तर पक्षांतर्गत वादातून काही प्रकार घडला गेला असल्यास तसे अहवालात पुरावे निशी स्पष्ट झाल्यास दोषी विरोधातही फास आवळला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics: आपण कुठे कमी पडलो? शिवसेनेकडून पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा
Maharashtra Politics: पुढच्या निवडणुकांसाठी तयार राहा, शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांना एकनाथ शिंदेंचे आदेश

काही वरिष्ठ मंत्र्यांनी जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाईतून पक्षाच्या उमेदवारा विरोधातच काम केल्याचा संशय शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. आता पराभूत उमेदवारांच्या अहवालातून पराभवाची नेमकी काय कारणे आहेत हे समोर आल्यानंतर पक्षाकडून काय निर्णय घेतला जाणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics: आपण कुठे कमी पडलो? शिवसेनेकडून पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा
Maharashtra Politics : मोठी बातमी! भाजपचा गटनेता ठरवणारे निरीक्षक ठरले, कोणाची केली नेमणूक? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com