

महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी
भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त बैठक
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. त्यासाठी पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त बैठकही झालीय. मात्र 26 डिसेंबरला सगळ्या गोष्टी समोर येतील, असं म्हणत अजित पवारांनी युतीच्या चर्चांचा सपेन्स कायम ठेवला असला तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुण्यात युतीचे संकेत दिलेत.
दरम्यान अजित पवारांनी फोन करून काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सतेज पाटलांनी दिलीय. मात्र महाविकास आघाडीतूनच पुण्यात निवडणुक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. अशातच अजित पवार मविआसोबत युती करत असतील. तर आम्हाला विचार करावा लागेल, असं म्हणत राऊतांनी युतीला विरोध दर्शवलाय. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजपपुढे कसं आव्हानं निर्माण होऊ शकतं पाहूयात.
2017 मध्ये भाजपने 162 पैकी 97 जागा जिंकल्या होत्या तर तत्कालीन राष्ट्रवादीने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर एकसंध असणाऱ्या शिवसेनेला अवघ्या 10 जागांवर तर 9 जागांवर काँग्रेस विजयी झालं होतं. अशातच महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मतविभाजन टळून भाजपपुढे आव्हानं निर्माण होईल. तसेच पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर थांबवणं दोन्ही पक्षांना शक्य होईल. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नवा पुणे पॅटर्न राबवत भाजपही शिंदेसेनेसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे.
तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत. सत्तासोपानासाठी सर्वच पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न केले जातायत. अजित पवारांकडून महापालिकेच्या सत्तेसाठी जुळवाजुळव सुरु असताना ठाकरेसेनेच्या विरोधामुळे मविआत अजित पवारांना सामावून घेतलं जाणार का? शरद पवार यासंर्दभात नेमकी काय भूमिका घेणार? राष्ट्रवादीच्या युतीचा हा नवा पुणे पॅटर्न मतदारांच्या पचनी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.