Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

CM Devendra Fadnavis And Ajit Pawar: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केला.
Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले.

  • जरांगे यांच्या आंदोलनाला आमदार आर्थिक मदत करत असल्याचा दावा.

  • ओबीसींचे आरक्षण धोक्यात येऊ शकते असा इशारा.

  • पुण्यात बैठक घेऊन आंदोलन करण्याची तयारी.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. 'अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत. अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.', असे विधान लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'जरांगेची मागणी मान्य झाली तर मराठा समाजाचं आरक्षण संपेल. अनेक आमदार, खासदार हे जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. ओबीसीच आरक्षण आमदार आणि खासदार याना संपवण्याचं आहे. जरांगे याना रेड कार्पेट घातलं आहे. मी गेवराईला गेलो तर माझ्यावर एफआयआर दाखल केली.'

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

जरांगेंच्या आंदोलनाला आमदार पैसे पुरवत असल्याचा आरोप हाकेंनी केला. 'जरांगे यांना सर्वपक्षीय आमदार रसद पुरवत आहेत. पाच ते दहा टक्के झुंडीने लोक मुंबईला गेले असतील तर आम्ही ५० टक्के आहोत. अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत. अजित पवार यांचे आमदारच जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ काय? उद्या पुण्यात राज्य स्तरावरची बैठक घेणार आहोत. ओबीसी एक असते तर यांची हिंमत झाली असती का? छगन भुजबळ योग्य वेळी बोलतील अशी आमची आशा आहे.', असे मत हाकेंनी व्यक्त केले.

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil: डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाचा इशारा देत सांगितले की, 'मुख्यमंत्री यांनी जी भूमिका घेतली त्याचे आम्ही आज स्वागत करतो. सरकारने आत्तापर्यंत ६० टक्के बोगस सर्टिफिकेट दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी समजाव की ओबीसी आरक्षण संपले आहे असे समजा. आम्ही संविधानिक मार्गाने लढतोय. कुणीही सांगाव की मी चुकीचं बोलतोय का? मी ओबीसी म्हणून लढतोय. आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. २ दिवस थांबा. उद्या बैठक आहे.'

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, सामान्य कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवास

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ठाकरे आणि पवारांनी मदत केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते म्हणाले की, 'राज्य सरकारकडून सामाजिक दुजाभाव सुरू आहे. काही झालं तरी आम्हालाच गावातून उचलले जाते. लक्ष्मण हाके चालले तर एफआयआर आणि जरांगे यांना रेड कार्पेट. जरांगे नावाची एक काडी होती तिला ज्वालामुखी करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मंत्री मंडळातील काही मंत्री जबाबदार आहेत.'

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com