Maharashtra Political News: अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-भाजपला समर्थन देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. शिंदे-भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवारांसह काही आमदारांकडून शरद पवार यांची मनधरणी सुरू आहे. दरम्यान, अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
शरद पवार यांच्या गटातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात हा नेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेणार आहे. त्यामुळे हा नेता नेमका आहे तरी कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना समर्थन दिलं. तर काही आमदार आणि पदाधिकारी अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आपण नव्याने राष्ट्रवादी पक्षाची उभारणी करू, असा विश्वास शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत.
अशातच शरद पवार यांच्या गटातील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे हा नेता शरद पवार यांचा अतिशय विश्वासू आणि जवळचा असल्याची माहिती आहे.राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना या नेत्याने अतिशय महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असून शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४० बैठक झाली. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीबाबत महायुतीची रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.