एकनाथ शिंदेंच्या या मंत्र्यांना डच्चू मिळणार? CM फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विस्ताराची चर्चा

eknath shinde shivsena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार आहे .
shivsena news
eknath shinde news Saam tv
Published On
Summary

राज्यात राडकीय घडामोडींना वेग

महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकरच विस्तार होण्याची शक्यता

काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीच्या सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. या विस्तारामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिमा सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार कठोर निकषांवर केला जाणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांना थेट डच्चू दिला जाणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

shivsena news
POD Taxi : मुंबईत लवकरच सुरू होणार 'पॉड टॅक्सी', वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठून कुठे धावणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मंत्रिमंडळात फेरबदलात आता नेत्याच्या कामगिरीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. वादग्रस्त विधाने करून पक्ष आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची यादी वरिष्ठांनी तयार केली आहे. त्यानुसार वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड बनवण्यात येत आहे. त्यानुसार त्यांच्या कामगिरीचा आलेख तपासला जाणार आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी संथ आहे. फाईल्सचा निपटारा वेगाने केलेला नाही. ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद घटली आहे, अशा मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे बोललं जातंय. तसेच मंत्रिमंडळात नव्या चेहरे आणि अभ्यासू आमदारांना मंत्रिमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

shivsena news
राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण टोकाला? कारकुनी चूक नव्हे, पटेल-तटकरेंची गच्छंतीच?

एकनाथ शिंदे यांनी वारंवार मंत्र्यांना कामगिरी आणि वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. काहींना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता वाचाळवीर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या विरोधात स्थानिक नेते आणि लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत . या मंत्र्यांची नकारात्मक अहवाल हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आलीत.

फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही इच्छुक नेत्यांनी वरिष्ठाच्या भेटीगाठी घेतल्याच्या सांगण्यात येत. त्यामुळे मंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com