
पुणे-नाशिक महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार.
प्रवासाचा वेळ २ तासांवरून २० मिनिटांवर येणार.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार.
पुणेकरांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. यातील एक म्हणजे पुणे आणि नाशिक दरम्यानच्या प्रवासात नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. नाशिक-पुणे हा प्रवास करायचा असेल तर सध्या रस्त्याने सुमारे दोन तास लागतात. आता हा वेळ काही मिनिटांवर येणार असून हा प्रवास २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
यामुळे प्रवासीसाठी आणि नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुणे महानगर प्रदेशासाठी सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू झालंय.
पुणे पल्स या वृत्तपत्रानुसार, राष्ट्रीय महामार्ग ६० वरील मार्ग विस्तारला जाणार आहे. तब्बल २८ किमीचा हा मार्ग असणार आहे. हा मार्ग नाशिक फाट्यापासून सुरू होऊन राजगुरुनगर (खेड) पर्यंत संपणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही तर सध्याच्या मार्गांवरील, विशेषतः चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्रांमधील वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास वर्तवला जात आहे.
नवीन कॉरिडॉर प्रमुख गावे आणि शहरांमधून जाणार आहे. महामार्गावरील प्रवेश आणि पर्यायी बायपास रोडसाठी जमीन लागणार असून अनेक गावांमध्ये सर्वेक्षण आणि भूसंपादन केले जात आहे. यामध्ये नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुली आणि चाकण यांचा समावेश आहे.
चाकण हे पुण्यातील सर्वात वर्दळीच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी, कडाचीवाडी आणि खराबवाडी सारख्या जवळच्या भागातून बायपास रस्ते बनवण्याची योजना आखली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास जलद करणे हा यामागील उद्देश नसून या मार्गातील लहान शहरांमधील वाहतुकीचा ताण कमी करणे हा आहे. कार वाहतूक कोंडीमुळे वाहने बऱ्याचदा तासन् तास अडकून पडतात.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. शहरातील रस्ते वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घ्यावीत यासाठी प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक रस्त्यांचा विस्तार प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलंय.
महामार्गाव्यतिरिक्त, बालेवाडी ते शेडगे वस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे-मान रोड यासारख्या भागांमध्ये सर्वेक्षण आणि जमिनीचे काम सुरू आहे. दरम्यान महत्त्वाकांक्षी असलेला रिंग रोड प्रकल्प देखील टप्प्याटप्प्याने पुढे सरकतोय. अनेक भागांमध्ये भूसंपादन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी करणे आणि चांगले प्रादेशिक कनेक्टिव्हिटी निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
तज्ज्ञांच्या मते, नवीन विस्तारीत महामार्गामुळे इंधनाचा वापर आणि वाहनांचे उत्सर्जन कमी होऊ शकते. कारण सुरळीत वाहतूक व्यवस्था असेल. यामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचबरोबर पुण्याच्या जलद औद्योगिक वाढीसाठी पुरक ठरेल. प्रवासाचा वेळ दोन तासांवरून फक्त २० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा असल्याने, प्रवाशांसाठी आणि शहराच्या एकूण विकासासाठी हा प्रकल्प गेम-चेंजर ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.