महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेवर कोण जाणार? संजय राऊतांनी दिली मोठी हिंट

Sanjay raut on mlc election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीवर संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं.
sanjay raut news update
Sanjay raut news Saam tv
Published On
Summary

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग

महाविकास आघाडीला मानावे लागणार एकच जागेवर समाधान

संजय राऊत यांनी दिली उमेदवाराच्या नावाची हिंट

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीनंतर महाविकास आघाडीनेही जोरदार फिल्डिंग लावली आहे. या निवडणुकीत महायुतीला ९ जागा जिंकण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागणार आहे. महाविकास आघाडीच्या एका जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरेंना उमेदवारी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही विधानपरिषदेच्या उमेदवारी मोठं भाष्य केलं आहे.

राज्यात विधानपरिषदेसाठी ९ जागांसाठी २९ मतांचा कोटा असणार आहे. तर एका विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ५१ टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या मतांच्या समीकरणानुसार महायुती 9 जागा तर महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावं, अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत संजय राऊत म्हणाले, 'आमचा एकच उमेदवार आहे. याबाबत उद्या सकाळी ११ वाजता कळेल की कोण अर्ज भरत आहे. तुम्हाला विधीमंडळाच्या पायरीवर गेल्यावर कळेल. आमची इच्छा का नसावी की उद्धव ठाकरेंनी अर्ज भरावा. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत जावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे'.

sanjay raut news update
महाविकास आघाडीतून विधानपरिषदेवर कोण जाणार? सुप्रिया सुळे यांनी थेट नावच सांगितलं

पुण्यातील महापालिकेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'पुण्यात आमचे एकमेव नगरसेवक आहे. आज त्यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करत आहोत. आता अनेक वर्ष निवडणुका नाहीत. पक्ष बांधणी करत आहोत. एक नगरसेवक आहे, ठीक आहे. कुठल्या परिस्थितीत राज्यात निवडणुका झाल्यात आणि होत आहेत'.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी २.५० लखांची फौज नेण्यात आली. साम दाम दंड भेदचा वापर केला जात आहे. निवडणुकीत दहशतवाद वापरला जात आहे. निवडणूक आयोग दहशतवादाचा उपयोग करत आहे. नरेंद्र मोदींना याची काय गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाचे नेते आहेत, त्यांना अशी गरज का भासत आहे. उद्या अंतराळात राजकारण झालं, तर मोदी तिकडचे नेते होतील. अमित शहा त्यांच्यासोबत आहेत. लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येत आहे, याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे, अशा शब्दात राऊतांनी पीएम मोदींवर टीका केली'.

sanjay raut news update
पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावरून राऊत यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली. '४० वर्षांपूर्वीचं पुस्तक आहे. ते पुस्तक यांनी वाचलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आम्हाला वाटत नाही की, त्या पुस्तकात काही चुकीचं लिहिलं आहे. ते लोक खूप छोटे आहेत, जे टीका करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com