Marathi News Live Updates: भरधाव कारने मोटारसायकल स्वाराला चिरडलं,घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 15 September : आज रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

भरधाव कारने मोटारसायकल स्वाराला चिरडलं,घटना सीसीटीव्हीत कैद

माणगाव इथं भरधाव कारने दोघा मोटार सायकल स्वाराला चिरडल्याची घटना समोर आलीय. माणगाव च्या कचेरी रोडवरील आपला बाजार समोर हा अपघात झालाय. अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. आपला बाजार इथं खरेदी साठी आलेले महिला आणि पुरुष असे दोघेजण खरेदी करून आपल्या मोटार सायकलवरून परतत असताना कारने मागून येवून मोटारसायकलला धडक दिली. दोनजण जखमी झाले आहेत. कार चालक अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती समोर आलीय.

भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं; कारचा टायर फुटल्यानंतरही पळवली कार

नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका कारने अनेकजणांना उडवल्याची घटना घडलीय. यात काहीजण जखमी झाले आहेत. शहरातील देगलूर नाका येथे एका कार चालकाने सुसाट कार चालवत अनेक गाड्यांना उडवलंय. कारचा टायर फुटल्यानंतरही कार चालकाने तब्बल एक किलोमीटर गाडी केवळ रिंगावर पळवल्याची माहिती आहे. त्यानंतर ही गाडी काही नागरिकांनी शहरातील नमस्कार चौकात अडवली. विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त कार ताब्यात घेतली आहे. आरोपीला मेडिकलसाठी पाठवण्यात आले आहे. चालक दारूच्या नशेत असल्याचेही माहिती मिळत आहे. आता या गाडीने किती जणांना उडवले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Belgaon Accident: बेळगावात ब्रेक फेल कंटेनरचा तवंदी घाटात भीषण अपघात, ६ वाहनांना उडवलं

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात ब्रेक फेल कंटेनरने सहा वाहनांना धडक दिलीय. या भीषण अपघातात तिघेजण ठार तर तिघे गंभीर जखमी झालेत. अपघातात वाहनांचा चक्काचूर झालाय.

Amravati:  तिवसाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

ही दहीहंडी स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी समर्पित आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांना शपथ घेतली. या दहीहंडीसाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आ.धीरज लिंगाडे, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कुणाल चौधरी यांनी उपस्थिती लावलीय.

Pune Ganeshotsav : पुणे मेट्रो आज आणि उद्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार 

पुणे मेट्रो आज आणि उद्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे मेट्रोचा निर्णय घेण्यात आलाय. सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्री २ पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. पुण्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.

Mumbai Traffic:  पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूककोंडी होणार कमी

अटल सेतू जवळ १४ पदरी रस्ता तयार होणार आहे. मुंबईहून बेंगळुरला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे. यामुळे मुंबई पुणे मार्गावरची वाहतूक ५० टक्क्याने कमी होणार आहे. पुढील ६ महिन्यात नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यांची माहिती दिलीय.

Dhangar Reservation: एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी नवी समिती नेमणार- शंभूराज देसाई

आज धनगर आरक्षण आंदोलकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि सरकारची चर्चा झाली. या बैठकीत नवीन समिती नेमण्यात येणार आहे.

पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

रविवारचा मुहूर्त साधत भाविकांकडून सकाळपासूनच दगडूशेठ गणपती परिसरात गर्दी झालीय. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाची रांग १ ते १.५ किलो मीटरपर्यंत मानाचे गणपती सह दगडूशेठ, मंडई, बाबू गेनू गणपती चे दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर आहे.

Ganesh Immersion: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

विसर्जन मिरवणुकीत प्रेशर मिड वापराल तर गुन्हे दाखल होणार आहे. डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी प्रेशर मिड या उपकरणाचा वापर केला जातो. या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते तसेच मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मिड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. विसर्जन मिरवणुकी दरम्यान ड्रोन चा वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी लागणार आहे.

 देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला;  उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप माळशिसरचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. पंढरपुरात धनगर समाजाचे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाला भेट देण्यासाठी आज जानकर पंढरपुरात आले होते.‌ यावेळी पत्रकारांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

 धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर होणार बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक होणार आहे.

पंढरपूर येथे आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे. सह्याद्री अतिथिगृहात बैठक होत आहे. काल पंढरपूर येथ चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली होती मात्र ती निष्फळ ठरली होती.

Pune News: पीक पाहणी नोंदणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत

पीक पाहणी नोंदणीसाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदत. राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविता आली नाही. पिक पाहणी करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत वाढ. एक ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत 46 टक्के क्षेत्रावरील पिकांचीच नोंद.

Solapur News: सोलापुरात धनगर समाज आक्रमक, आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन 

सोलापुरात धनगर आंदोलन आक्रमक पवित्र्यात, पांढपुरातील धनगर उपोषणकर्त्याची प्रकृती खालवल्या नंतर राज्यभर आंदोलन चिघळलं. सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचे 'ढोल बजावो आंदोलन' सुरू आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या घराला आले पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

Kalyan News: कल्याणमधून ४ बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

कल्याण पूर्व पिसवली परिसरातून चार बांगलादेशीना पोलिसांनी अटक केली. दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. बीएसएफने मानपाडा पोलिसांनी माहिती दिली होती. बीएसएफकडून माहिती मिळताच मानपाडा पोलिसांची कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

छत्रपती संभाजीनगरमधील बजाज रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान काही तासांत रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात धिंगाणा घालत तोडफोड केली. त्याशिवाय हृदयरोग तज्ज्ञांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत उपचारांची फाईल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता सातारा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर. राज्य सरकारने काढला शासन निर्णय. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार आणि विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Ganesh Visarjan: गणरायला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

गणरायला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव आणि अन्य सुविधांची उपलब्धता असणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी - कर्मचारी आणि ७१ नियंत्रण कक्ष असणार आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर आपल्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे.

Sambhajinagar News:  शिवसेनेचे वरिष्ठ नेते दीपक केसरकर मराठा आंदोलकांच्या भेटीला

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री दीपक केसरकर हे मराठा आंदोलकांच्या भेटीला आले आहेत. संध्याकाळी ६ वाजता मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे घेणार मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. संभाजीनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची क्रांती चौक येथे जाऊन घेणार भेट घेणार आहेत.

Dhule News:  शरद पवार यांच्या हस्ते भजनी मंडळांना टाळ, मृदुंगाचे वाटप

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा व खासदार शरद पवार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होते, यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते भजनी मंडळांना टाळ, मृदुंग व ईतर साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

वारकरी संप्रदायाच्या कार्यात भजनी मंडळाचे मोठे योगदान असून यावेळी शरद पवार यांनी भजनी मंडळांना साहित्य वाटप करत त्यांच्या कार्याचा कौतुक केले आहे. शिंदखेडा तालुक्यातील जवळपास 173 भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले आहे, भजनी मंडळात बाल भजनी मंडळांचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळाले आहे.

Amravti News: धक्कादायक! अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी जखमी 

अस्वलीच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येत असलेल्या रायपुर अरण्यात समोर आली आहे. सोमाजी भुया सावलकर असे जखमी गुराख्याचे नाव आहे. सोमाजी सावलकर हे म्हशी चराई करण्यासाठी रायपूरच्या जंगलात गेले होते. दरम्यान अस्वलाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे...

Jalna News: मोठी बातमी! जालन्यात पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

जालना जिल्ह्यातील परतुर शहरात पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलय, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 5 गावठी बंदूक,3 तलवार, आणि 3,कोयता ,चाकू जप्त केलेत, परतूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील साईनगर भागातून पोलिसांनी छापा टाकून ही शस्त्र जप्त केली, याप्रकरणी करतारसिंग पटवा आणि सोन्यासिंग ठाकूर अशा दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात , दरम्यान ही शस्त्र कुठून आणि कशासाठी आली याचा शोध पोलीस घेत आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शिर्डी विमानतळावर आगमन, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज जुनी पेन्शन संघटनेचे अधिवेशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई आमदार शंकरराव गडाख उपस्थित आहेत. ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिर्डी विमानतळावर दाखल होते. यावेळी मुस्लिम शिवसैनिकांकडून उध्दव ठाकरेंना छ्त्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट देण्यात आला.

Pandharpur News: मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर शिष्टमंडळात फूट

पंढरपूर येथील धनगर आरक्षण शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे. या शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. धनगर शिष्टमंडळातील सदस्य आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या सात वर्षांपासून पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी दहा जणांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बैठकी पूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी उपोषणकर्त्यांसोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

Solapur News: मराठा समाज आक्रमक, राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

सोलापुरात बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना शह देण्यासाठी राज्यसरकार पुरस्कृत आंदोलन उभ केलं आहे, त्यांनी अगोदर मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका जाहीर करावी.

राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनात फक्त कंत्राटदार लोक आहेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाज आहे. अशी टिका सकाळ मराठा समजाकडून करण्यात आली. दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही यावेळी केली.

Sangli News: मंगळवेढा परिसरात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

Mangalvedha News: सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूरच्या मंगळवेढा या परिसरात अज्ञात ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञान ड्रोन आकाशात घीरट्या घालत असलेने हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत. याबाबत अनेक चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थ ड्रोनच्या दहशतीखाली वावरत आहेत. याबाबत जत पोलिसांनी सुद्धा दक्षता बाळगली असून ड्रोन फिरल्याची माहिती कळताच त्या गावाच्या परिसरामध्ये पोलिसांकडून रोड पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. मात्र हे ड्रोन कोणाचे आहेत याबाबत अध्यापि कोणताही पत्ता लागलेला नाही.

Maharashtra Governor News: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले 'वर्षा'वरील श्री गणेशाचे दर्शन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी त्‍यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

Sangli News: बापरे! नागरी वस्तीत सापडले चार फूट मगरीचे पिल्लू

सांगलीच्या आष्टा येथील खोत मळा अमृत नगर रस्त्यावरील नृसिंह मंदिरासमोर झुडपात चार फुटाचे मगरीचे पिल्लू आढळल्याने नागरिकात खळबळ माजली. या मगरीच्या पिल्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अमृतनगर परिसरातील नृसिंह मंदिरासमोर किंवा पाठीमागील बाजूला मोठा ओढा किंवा नदी नाही. तरीही मगरीचे पिल्लू या परिसरात कसे आले याची चर्चा सुरू आहे.. हे छोटेसे पिल्लू असून तिची आई ही या परिसरात असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राणी मित्रांनी व नागरिकांनी मगरीचे पिल्लू पकडून ते वनविभागाच्या कडे स्वाधीन केले. या परिसरात वन विभागाच्या वतीने तातडीने शोध मोहीम राबवण्याची मागणी व्यक्त होत आहे.

Vikhroli Accident: विक्रोळी गोदरेज महामार्गावर भीषण अपघात; ६ जण जखमी

विक्रोळी गोदरेज महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण कार अपघातात 6 जण गंभीर जखमी झालेत. भरधाव वेगात चालकाचा बैलेंस गेल्याने हा अपघात झाला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात वीज तार चोरट्यांचा हैदोस

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त असताना आता वीज तार चोरट्यांच्या हैदोसामुळे दहशतीत आहे. रात्रीच्या सुमारास ही सशस्त्र टोळी शेतशिवारात चक्क विजेचे खांब पाडून वीज वाहक अल्युमिनियमच्या तार चोरी करीत आहे. कटर ने खांबाचे स्टे कापून खांब पाडायचे आणि त्यावरील महागड्या अल्युमिनियम तारा, कंडक्टर, रोहित्रातील ग्रीप आणि ऑइल चोरून नेण्याचे गुन्हे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीसह जिल्हात घडले आहे. ह्या चोरट्या टोळीकडून बहरलेल्या शेतीपिकांची देखील प्रचंड नासधूस केल्या जात आहे. शेतातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने देखील पिकांचे नुकसान वाढले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्र गस्त वाढवून या टोळीचा सुगावा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Baramati News:  पुरंदरमध्ये वाहू लागले निवडणुकीचे वारे; पोस्टरमधून आमदार संजय जगतापांना आव्हान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सूरवात झाली असून निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी सरसवल्याच पाहायला मिळत आहे.

सासवड जेजुरी मार्गावर लावलेले पोस्टर लक्षवेधी ठरत असून तालुकाभर याची चर्चा रंगली आहे. यंदा आम्ही परिवर्तन घडवाणारच असा मजकूर यावर लिहण्यात आला असून आमदार जगतापांना यातून डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.

Raigad News: घरगुती गणेशोत्सवात मानवी उत्‍क्रांतीचा प्रवास,  धुमाळ कुटुंबियांचा गणपती

सार्वजनिक गणपतीला मोठमोठे देखावे सादर केले जातात तशाच पद्धतीने अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी आपल्या घरगुती गणपती समोर मानवी उत्क्रांतीचा देखावा उभा केल आहे. अश्‍मयुगापासून आज संगणक युगापर्यंत मानवी उत्‍क्रांतीचे टप्‍पे या देखाव्याच्या माध्यमातुन चलतचित्राच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहेत. आपण अभ्यासक्रमात हे शिकतो मात्र सामान्‍य माणसाला हे टप्‍पे माहीत नसतात. हे माहीत व्‍हावे या हेतूने हा देखावा सादर केल्‍याचे रमेश धुमाळ यांनी सांगितले.

Maratha Reservation : मनोज जरांगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील मतभेद लवकरच मिटणार?

मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी सोलापूर मराठा क्रांती मोर्चाचा पुढाकार घेतला आहे.

अंतरवाली सराटी आणि बार्शीत जाऊन मराठा क्रांती मोर्चा समन्व्यकांनी दोघांची घेतली भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांचा लढा हा मराठा आरक्षणासाठी असून आपापसातील मतभेद मिटवून मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याची भूमिका क्रांती मोर्चाने ठेवली आहे.

एकमेकांवर टिका करणे टाळून मराठ्यांना सग्यासोयऱ्यासहित ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सोलापूर मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली ही समन्वयाची भूमिकेला दोन्ही नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाइल टॉवरवर चढून शोले आंदोलन

धनगर समाजाचे आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करावी तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाचे उपोषणाला पाठिंबा म्हणून यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांनी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मोबाईल टॉवर वर चढून शोले आंदोलन सुरू केले आहे .. गजानन बोरकर हे रात्रीच एक वाजता या मोबाईल टॉवर वर चढले असल्याची माहिती मिळत आहे. टॉवर खाली धनगर समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Ajit Pawar Banners : अजितदादा भावी मुख्यमंत्री, बारामतीत पुन्हा झळकले बॅनर्स

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. सध्या गणपती उत्सव साजरा केला जातोय. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या अनेक दिवसापासून बारामतीतील कार्य कर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार पवार मुख्यमंत्री व्हावेत.. या आधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशा आशयाचे फ्लेक्स लागले होते..

Ajit Pawar News : अजित पवार आज बारामतीत जनता दरबार घेणार, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत सकाळी सहा वाजल्यापासूनच शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना दिल्या. शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्याकरिता अजित पवार घेणार जनता दरबार घेणार आहेत.

माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनगर हे ऑनलाइन करणार असून या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

Gondia News : वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, परिसरात हळहळ

गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील बसंतराव ढोरे हा शेतात गेला होता. उशिरापर्यंत घरी परत पोहचला नसल्याने त्या करीता शोध मोहीम सुरू झाली. त्यांचे शेत जंगला लागत असल्याने गावकऱ्यांनी जंगलामध्ये शोध घेतले असताना, त्याचा मृतदेह जंगलात आढळून आला. याची माहिती वनविभागाला व पोलीसांना देण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने ढोरे कुटुंबावर मोठ संकट आलं आहे.

Khanapur Firing : खानापूरच्या गोळीबारात एकाचा मृत्यू, परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

खडकवासला येथून दहा किलोमीटरवर असलेल्या खानापूर गावात पूर्व वैमनस्यातून शनिवारी मध्यरात्री दोन गटात गोळीबारची घटना घडली आहे. यामध्ये, एक जण मयत झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती पुन्हा आता बाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com