Ajit Pawar News: ....म्हणून मी म्हणालो खटाखट गरिबी हटाओ; अजित पवारांकडून 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण!

Loksabha Election 2024: 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.
Ajit Pawar On BJP
Ajit Pawar On BJPSaam Tv

अक्षय बडवे, पुणे|ता. १८ एप्रिल २०२४

'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. इंदापुरच्या सभेत बोलताना केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. यावर आज पुण्यामध्ये बोलताना हा ग्रामीण भाषेतला शब्द असल्याचे सांगत स्पष्टीकरण केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या या विधानावर खुलासा केला.

"ते खटाखट खटाखट म्हणाले म्हणून मी खसाखस खसाखस गरिबी हटाओ म्हणालो. आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे. त्याबाबत जास्त बाऊ करण्याची गरज नाही," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

Ajit Pawar On BJP
Maharashtra Politics: उत्कर्षा रुपवतेंचा कॉंग्रेसला रामराम! वंचितकडून लढणार?

दरम्यान, आज सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून यावेळी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित राहणार आहेत. 

Ajit Pawar On BJP
Kolhapur News : कोल्हापुरात घडली नात्याला काळीमा फासणारी घटना; जन्मदात्या आईनेचं विकलं मुलीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com