Dr Bhagwan Pawar News : CM शिंदेंना खळबळजनक पत्र लिहिणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस; काय आहे प्रकरण?

Dr Bhagwan Pawar latest news : शासनाकडून निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेत डॉ. भगवान अंतू पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.
CM शिंदेंना खळबळजनक पत्र लिहिणाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस; काय आहे प्रकरण?
Dr Bhagwan Pawar News Saam tv

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. डॉ. भगवान पवार यांचं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यानंतर तुमच्यामुळे शासनाची बदनामी झाली, असं म्हणत डॉ. भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस साम टीव्हीच्या हाती आली आहे.

डॉ. भगवान पवार यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या निवेदनाची दखल घेत शासनाने पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. भगवान पवार यांना ३ दिवसांत खुलासा करण्यास सांगितलं आहे. वेळेत खुलासा न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

CM शिंदेंना खळबळजनक पत्र लिहिणाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस; काय आहे प्रकरण?
Pune Accident : अवघ्या २ तासांत तब्बल १४ कॉल, डॉ. तावरेवर कुणाचा दबाव? पुणे अपघात प्रकरणात चक्रावणारा खुलासा

डॉ. भगवान पवार यांनी काय आरोप केला?

मंत्री तानाजी सावंत यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याबाबतच्या आरोप डॉ. भगवान पवार यांना पत्रातून केला होता. डॉ. पवार यांनी पत्राची प्रत विहित मार्गाने शासनाला दिली होती.

मात्र, २५ मे व २६ मे रोजी शनिवार, रविवार सार्वजनिक सुट्टी होती. निवेदन पत्र शासनाला २७ मे रोजी प्राप्त झाले. त्यापूर्वीच पूर्वीच पवार यांच्या निवेदनाच्या बातम्या माध्यम आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. यावरून अनेक लोकप्रतिनिधींनीही सोशल मीडियावर शासनाची बदनामी झाल्याचं म्हटलं.

CM शिंदेंना खळबळजनक पत्र लिहिणाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस; काय आहे प्रकरण?
Lok Sabha 2024: उत्तरप्रदेशमध्ये एका चुकीमुळे भाजपचं आकड्यांचं गणित फसलं? लोकसभा निकालापूर्वी सी-व्होटरने केला मोठा दावा

डॉ. पवार यांनी निवेदन प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा ठपका त्यांच्यावर शासनाच्या निवेदनात ठेवण्यात आला आहे. तसेच पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम १९७९ मधील ३ आणि ९ चा भंग केल्याचा नोटीसीत म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com